onion.jpg
onion.jpg 
नाशिक

आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही देशभरात थेट 'कांदा' विक्री करता येणे शक्‍य!...कारण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (लासलगाव) कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धता व शासन स्तरावर कोणत्या ठिकाणी व्यापारी किंवा थेट शेतकरी तसेच शेतकरी उत्पादकांच्या संस्था सांघीक सहकारी व्यवस्थेकडे किती कांदा माल विक्रीस उपलब्ध आहे. याची ऑनलाईन माहिती तयार झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील सरव्यवस्थापक सुनील पवार व नाशिक येथील पणन मंडळाचे पसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही देशभरात थेट कांदा विक्री करता येणे शक्‍य होणार आहे. 

मालवाहतूक अगर अधिक माल असेल तर थेट रेल्वेने रॅकची व्यवस्था

महाराष्ट्रात व विशेषत: नाशिक जिल्हा, पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे व सोलापूर या जिल्ह्यांत कांदा उत्पादन व बाजार समितीत विक्री होते. परंतु मजुरांअभावी बाजार समितीत लिलावावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे देशभरात कांदा माल उपलब्धता व व्यवहार खरेदीदार व विक्रेता यात थेट फोनने अगर ऑनलाईन पध्दतीने होऊन विक्रीनंतर हा शेतीमाल खरेदी झालेल्या शहरात पोहचविण्यासाठी लागणारी मालवाहतूक अगर अधिक माल असेल तर थेट रेल्वेने रॅकची व्यवस्था करून पोहचवण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासह समन्वय ठेवण्यासाठी राज्यानुसार वरिष्ठ अधिकारी मदत व सहकार्य करणार आहेत, असे श्री. बारी यांनी सांगीतले. 

व्यापारी व शेतकरी शेतीपुरक संस्थेच्या नावाची व मालाची उपलब्धता याची माहिती शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ वेबसाईटवर तसेच नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर बारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक +917588551724 यावर उपलब्ध असुन याचा वापर करून खरेदी विक्री करावी. काही मालखरेदी व पाठवण्यासाठी काही समस्या निर्माण झाली तर संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT