Fraud esakal
नाशिक

व्हॉट्स अपवर मेसेज टाकून ज्येष्ठ वकिलाला घातला गंडा

विनोद बेदरकर

नाशिक : तूमचे सीम कार्ड २४ तासांत ब्लॉक केले जाईल, ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा’ असा व्हॉट्स अपवर मेसेज टाकून एका भामट्याने वृद्ध वकिलास ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. याप्रकरणी ॲड. नामदेव शिवनाथ गिते (६२, रा. कालिका मंदिरामागे) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

ॲड. गिते यांच्या फिर्यादीनुसार त्यांना २० मेस सकाळच्या सुमारास भामट्याने व्हॉट्सअपवर मेसेज केला. त्यात तुमचे सीम कार्ड निलंबीत झाले असून २४ तासांच्या आत ब्लॉक होणार आहे. त्यासाठी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. त्यामुळे गिते यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर भामट्याने त्यांना प्ले स्टोअरवरून रिचार्ज क्युब ॲप इस्टॉल करण्यास सांगितले.

त्यानंतर गिते यांना केवायसी क्विक सपोर्ट हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगत त्यांच्या फोनवरून संभाषण करीत गिते यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर सुमारे तासाभरात भामट्याने गिते यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी गिते यांनी मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला अधिकारी नको, मंत्र्यानं डावललं; IAS मनिषा म्हैसकर यांचा महायुतीच्या मंत्र्याबाबत गौप्यस्फोट

Pune Crime: पुण्यात खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलासोबत भयानक कृत्य... प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले, ऑफिस बॉयला अटक

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या पुसदमध्ये धार्मिक स्थळांवरील विनापरवाना भोंगे स्वेच्छेने काढले

Wild Elephant Omkar Maharashtra : गोव्यात धुमाकूळ घालून 'ओंकार' हत्ती महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल; शेतीसह वाहनांचे मोठे नुकसान, पाहा सद्यस्थिती काय?

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक... थेट पार्किंगमध्ये... Video पाहा

SCROLL FOR NEXT