New Bytco Hospital esakal
नाशिक

नाशिक : नवीन बिटको रुग्णालयात ओपीडी सुरु

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेच्या नवीन बिटको (NMC New Bytco Hospital) रुग्णालयात जुन्या रुग्णालयातील बाह्यरुग्‍ण तपासणी कक्ष स्थलांतरित करून सुरू करण्यात आला आहे. मात्र, अशातच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय विभागाकडून पूर्ण क्षमेतेने रुग्णालय सुरू करण्याबाबत सावध पावले टाकली जात आहे. नवीन रुग्णालयात शस्त्रक्रियांसह इतर विभागाचे कामकाज सुरू करण्यासाठी वैद्यकीय निकषानुसार शस्त्रक्रिया विभाग निर्जंतुक (sanitization) असल्याची खात्री करून घेण्यासाठी भिंतीचे नमुने तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे विभाग स्थलांतरित होणार आहे. (OPD started at New Bytco Hospital Nashik News)

नाशिक रोडला भूतपूर्व नाशिक रोड देवळाली नगरपालिकेच्या काळापासून कार्यान्वित असलेल्या बिटको रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. त्यासाठी नव्याने महापालिकेने अद्ययावत रुग्णालयाची इमारत उभारली असली तरी, त्यातील कामकाज मात्र सुरू नाही. दोन वर्षापूर्वी उद्भवलेल्या कोरोना काळात ही नवीन इमारत वैद्यकीय सेवेसाठी मोठी मदतगार ठरली. महापालिकेचा सर्वात मोठा कोरोना रुग्णालयाचा भार या इमारतीतून वाहिला गेला. मात्र, त्यानंतर येथील कामकाज थंडावले. त्याचवेळी जुन्या बिटको रुग्णालयाचे कामकाज नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी झाली. त्यानुसार महापालिकेने बांधकाम काम पूर्ण होत आलेल्या विभागात कामकाज सुरू केले आहे. जुन्या बिटको रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्ष नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे.

भिंतीची चाचणी

शस्त्रक्रिया प्रसूतीसह विविध महत्त्वाचे विभाग सुरू करण्यापूर्वी येथील सोयी- सुविधांसोबत त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. भिंतीपासून तर कक्षांच्या निर्जंतुकरणाची कामे अद्याप बाकी आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागाकडून भिंतीची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच हळूहळू विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

शासकीय दराने स्कॅनिंग

बिटको रुग्णालयात एमआरआय, सीटी- स्कॅन मशिनची सुविधा आहे. मात्र, मनुष्यबळ नसल्याने यंत्रणा पडून आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी लक्ष घातल्यानंतर आता निविदा निघाली आहे. येत्या आठवडाभरात सीटी स्कॅन मशिनचे कामकाज सुरू होण्याचा अंदाज आहे. हा विभाग आउटसोर्सिंगने चालविला जाणार असला तरी, येथील दर मात्र सरकारी असतील. साधारण ८०० रुपयांत ही सुविधा रुग्णांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT