10th students.jpg
10th students.jpg 
नाशिक

दहावी, बारावी नापासांना ऑक्टोबरमध्ये पास होण्याची संधी; वाचा सविस्तर

संतोष विंचू

नाशिक / येवला : इयत्ता दहावी-बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे लटकलेली ही परीक्षा होणार की नाही, हा प्रश्‍न असताना आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संभाव्य वेळापत्रक तयार करून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दहावी, बारावी नापासांना ऑक्टोबरमध्ये पास होण्याची संधी

राज्य मंडळाच्या सचिवांनी गुरुवारी (ता. १३) संभाव्य वेळापत्रक जारी केले. त्यानुसार दहावीची फेरपरीक्षा ६ ते २३ ऑक्टोबरदरम्यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा ६ ते २९ ऑक्‍टोबरदरम्यान होईल. यामध्ये दहावीची श्रेणी व तोंडी परीक्षा १ ऑक्टोबरपासून घेतली जाईल व आउट ऑफ टर्न परीक्षा २४ ऑक्टोबरला होईल.

पुरवणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा

बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षाही १ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि आउट ऑफ टर्न परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्याचा कालावधी निश्‍चित केला आहे. मात्र, या संभाव्य वेळापत्रकाबाबत राज्य सचिवांनी विभागीय मंडळांच्या सचिवांना पत्र देऊन यातील अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे १७ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे सुचविले आहे. हे संभाव्य वेळापत्रक असल्याने त्याबाबत गोपनीयता पाळण्याच्या सूचनाही राज्य मंडळाच्या सचिवांनी या पत्रात दिल्या असल्या, तरी हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संपादन - रमेश चौधरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT