exam 123.jpg 
नाशिक

महत्वाची बातमी : "यूपीएससी'कडून परीक्षेच्या केंद्र बदलाची संधी...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 4 ऑक्‍टोबर 2020 ला नागरी सेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलाची "यूपीएससी'कडून संधी दिली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. 

यूपीएससीतर्फे जारी पत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे यापूर्वीच परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता. असे असताना अजूनही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याने परीक्षा केंद्रात बदल करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. ही बाब लक्षात घेत उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलाची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे यूपीएससीतर्फे जारी पत्रकात म्हटले आहे. 


दोन टप्प्यांत संधी 
उमेदवारांना दोन टप्प्यांत अर्ज दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यांत मंगळवार (ता. 7)पासून 13 जुलैच्या सायंकाळी सहापर्यंत अर्ज दुरुस्ती करताना परीक्षा केंद्र निवडता येईल. दुसऱ्या टप्प्यात 20 ते 24 जुलै (सायंकाळी 6 पर्यंत) संकेतस्थळावरून अर्जात दुरुस्ती करून परीक्षा केंद्र निवडता येईल. एकदा निवडलेला पर्याय लॉक होईल, असेही यूपीएससीतर्फे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकदा बदललेला पर्याय पुन्हा बदलता येणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम उपलब्धता या तत्त्वानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल. 

 
अर्ज माघारीची संधी 

उमेदवारांनी या परीक्षेसाठी यापूर्वी भरलेला अर्ज माघारी घेण्याचीही संधी दिली जाणार आहे. परीक्षा केंद्र दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 ते 8 ऑगस्टदरम्यान नोंदणीकृत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेण्याची सवलत दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

Ozone Layer Recovery : ओझोन थरात सुधारणा, छिद्र झाले लहान सीएफसीवरील निर्बंधांचा परिणाम ; २०६६ पर्यंत पूर्ण दिलासा मिळण्याची शक्यता

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

SCROLL FOR NEXT