criminal esakal
नाशिक

गुन्हेगारीचा शिक्काही पुसणार अन् नोकऱ्याही मिळाल्या!

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यातील कारागृहातील कुख्यात गुन्हेगारीचा अभ्यास असलेल्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी कारवायांसोबत चांगल्या वर्तणुकीची हमी देणाऱ्यांसाठी गुन्हेगार सुधार कार्यक्रम हाती घेतला. आणि चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सुधारण्याची संधी दिली. मोक्का, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधसारख्या कारवायांतून सुधारण्याची संधी दिली आणि गुन्हेगारांसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरली....(opportunity-for-criminals-from-police-to-quit-crime-nashik-marathi-news)

गुन्हेगारांसाठी हा दिवस आनंदाची पर्वणी देणारा

आठवडाभरात सराईत गुन्हेगारांपैकी 250 वर गुन्हेगारांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून सुधारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर चांगला परिणाम दिसणार आहे. भावनेच्या भरात, अनावधानाने व अजाणतेपणे ज्यांचा गुन्हेगारीत सहभाग आला आहे. मात्र, त्यांना गुन्हेगारी मार्ग सोडून समाजात सामान्य जीवन जगायचे आहे, अशांचा गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीचा आढावा घेतला जात आहे. हा सुधार मेळावा गुन्हेगारांसाठी खरोखर आनंदाची पर्वणी देणारा ठरला. कोणाला नोकरी मिळाली तर कोणाचे पोलिस रेकॉर्डवरील नाव कमी झाले. काहींचे कागदपत्रा जमा होत असून, त्यांनाही पोट भरण्याइतपत रोजगार उपलब्ध होणार आहे. गुन्हेगार हा शिक्का पुसून सर्वसाधारण नागरिक म्हणून पुन्हा जगता येईल, या आशेने जमा झालेल्या. या वेळी उपस्थित असलेल्या सर्व गुन्हेगारांच्या शंकाचे समाधान करून देण्यात आले. पात्र असलेल्या व्यक्तींना चालक, सुरक्षारक्षक या कामी नियुक्ती करण्यात आली. तसेच संबंधित व्यक्तींना सरकारी उपक्रमांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

अडीचशे गुन्हेगारांचा प्रतिसाद

पोलिस आयुक्तांच्या उपक्रमाला शहरातील विभाग एक- ६९, विभाग दोन- ६४, विभाग तीन- ५४, विभाग चार- ६३ याप्रमाणे २५० गुन्हेगारांनी प्रतिसाद देत पोलिसांना गुन्हेगारी सोडून समाजविघातक कृत्यात सहभागी न होण्याचे हमीपत्र लिहून दिले आहे. चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रासोबत अनेकांना रोजगारांची संधी देत पोलिसांनी गुन्हेगार सुधार कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविला आहे. आठवडाभरात सराईत गुन्हेगारांपैकी अडीचशेवर गुन्हेगारांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून सुधारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर चांगला परिणाम दिसणार आहे.

निकोप समाजासाठी गुन्हेगार नव्हे, तर गुन्हेगारी संपविणे हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. गुन्हेगार सुधार योजना २०२१ हा त्याचाच एक भाग आहे. वाट चुकलेल्यांना चांगले नागरिक बनण्याची संधी देताना त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. एवढी संधी देऊनही ज्यांना गुन्हेगारी सोडायचीच नसेल, अशांसाठी मोक्का, हद्दपारी, एमपीडीए यांसह पोलिसांचे इतर उपाय आहेतच. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : धावपट्टीला स्पर्श करताच विमानाने घेतले पुन्हा हवेत उड्डाण

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT