PSI esakal
नाशिक

Nashik : पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना फौजदार होण्याची संधी

महेंद्र महाजन

नाशिक : राज्य सरकारने (State Government) पोलिस दलातील (Police Department) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, नाईक, शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. २५० पदांच्या भरतीसाठी ३० जुलैला अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे केंद्रावर मुख्य लेखी (Mains Written Exam) परीक्षा होईल. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही पदे आरक्षणानुसार नव्हे, तर गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. (Opportunity for police personnel to become Police Sub Inspector Nashik News)

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठीची पात्रता अशी : १ जानेवारी २०२२ रोजी सहायक उपनिरीक्षक, हवालदार, नाईक आणि पोलिस शिपाई म्हणून किमान सेवा-पदवीधर उमेदवारांसाठी ४ वर्षे, बारावी अथवा समतुल्य उत्तीर्णांसाठी ५ वर्षे, दहावी अथवा समतुल्य उत्तीर्णांसाठी ६ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४०, तर इतरांसाठी ३५ वर्षे अशी असेल. मुख्य परीक्षा तीनशे गुणांची आणि शारीरिक चाचणी शंभर गुणांची असेल. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजले जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल. आजपासून २९ जूनला रात्री बाराला एक मिनीट कमी असेपर्यंत अर्ज करता येतील.

मुख्य परीक्षेसाठी विधी (प्रमुख कायदे व इतर कायदे) हा विषय इंग्रजी आणि मराठी माध्यमातून असेल. दीडशे प्रश्‍नांसाठी तीनशे गुण असतील. दीड तास वेळ राहील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप असेल. परीक्षेसाठी मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी ५४४, तर इतरांसाठी ८४४ रुपये शुल्क असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT