Ozar airport
Ozar airport esakal
नाशिक

1000 प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविता येणे शक्य; टर्मिनल विस्ताराला संधी

विक्रांत मते

नाशिक : ओझर येथे नव्याने बांधलेल्या एअर टर्मिनलची (Air Terminal) सध्याची क्षमता तीनशे प्रवाशांची आहे. भविष्यात प्रवाशांची गर्दी वाढल्यास एक हजारापर्यंत प्रवासी क्षमता करता येणे शक्य आहे. त्यामुळे विमानतळाच्या (Airport) क्षमेतेत भर पडली असून, विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. (Opportunity for terminal expansion of ozar airport nashik development news)

नाशिकच्या ओझर विमानतळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ओझर विमानतळावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतानाही आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू होत नसल्याने या विषयाला फुंकर घालण्यासाठी ‘सकाळ’ च्या माध्यमातून विषय हाताळला जात आहे. त्यासाठी विमानतळाच्या क्षमेतेचे आकलन होण्याच्या दृष्टीने विमानतळाशी संबंधित विषय नाशिककरांसमोर आणले जात आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची धावपट्टी, नाईट लॅण्डींगची व्यवस्था, मेन्टेनन्स, रिपेरिंग व ओव्हर ऑईलिंग (एमआरओ) या बाजू मांडण्यात आल्या आहेत. उड्डाणासाठी आवश्‍यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींमध्ये टर्मिनल महत्त्वाचे ठरते.

विमानतळावर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन टर्मिनल बांधणी किंवा विस्तार करता येणे शक्य असते. परंतु, त्यासाठी हवाई खात्याची परवानगी बंधनकारक असते. नाशिकच्या ओझर विमानतळावर सध्या तीनशे प्रवासी क्षमेतेच्या ट्रर्मिनलची उभारणी करण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या निधीतून टर्मिनल उभारले असून, राज्य शासनाने ९९ वर्षांच्या करारासाठी टर्मिनलला जागा दिली आहे. विमानतळाचा विस्तार व त्यावरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. सध्या तीनशे प्रवासी क्षमेतेचे टर्मिनल असले तरी एक हजार प्रवाशांपर्यंत तत्काळ क्षमता वाढविता येणे शक्य आहे. नाशिकमध्ये आयटी कंपन्या आणायच्या असेल तर त्यासाठी विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे.

"नाशिकला आंतरराष्‍ट्रीय विमानतळ होणे, स्वागतार्ह आहे. आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या कुटुंबासाठी खूप सोयीचे व सुखद होईल. आपल्‍या मायभूमीच्या सतत सान्निध्यात राहण्याची इच्छा पूर्ण होईल. तसेच, मुंबई, पुणे, शिर्डी येथून येण्यापेक्षा थेट नाशिकला थांबा मिळेल. तसेच सामानाची ने- आण करणे सोपे होईल व वेळेची बचत होईल. तसेच परदेशातून वर्षातून येणे- जाणेही वाढेल. यामुळे नातेवाईक आप्तस्‍वकीय यांच्यासोबत जास्‍त वेळ घालविता येईल."

- कांचन पुजारी, गृहिणी

"नाशिक एक स्‍मार्टसिटी आहे, त्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय विमानतळ असणे आवश्‍यक आहे. परदेशात नोकरीनिमित्‍त असणाऱ्यांना मुला- बाळाच्या भेटीसाठी सोयीचे व सोपे होईल. मर्यादित विमानसेवेपेक्षा अभ्‍यासपूर्ण व थेट विमानसेवा सुरू केल्‍यास येथील छोट्या- मोठया शेतकऱ्यांना फायद्याचे होईल. तसेच रोजगारातही वाढ होऊन नाशिकची आर्थिक स्‍थिती सुधारेल. नाशिक हे प्रेक्षणीय स्‍थळ आहे. या दृष्‍टीने पर्यटकांचे प्रमाण वाढेल. पर्यायाने सरकारच्या उत्‍पन्नातही भर पडेल." - नयना जोशी, गृहिणी

"विमानतळामुळे उत्‍तर महाराष्‍ट्राची प्रगती झपाट्याने होईल. तसेच नाशिकमध्ये रब्‍बी, खरीप पिके तसेच फळे यांचे उत्‍पन्न मुबलक प्रमाणात आहे. नाशिकचे द्राक्षे प्रसिद्ध आहेत. परंतु, शेतीमालास योग्‍य भाव मिळत नाही. विमानतळ कार्गो सेवेमुळे निर्यात क्षमता वाढेल. मालास योग्‍य भाव मिळेल शेतकऱ्याची आर्थिक परिस्‍थिती सुधारून देशाच्या प्रगतीत हातभार लागेल. तसेच नोकरीनिमित्‍त परदेशात असणारे आप्तस्‍वकीयांना भेटीसाठी सोयीचे होईल."

- रीना टेंभेकर, गृहिणी, एलआयसी एजंट

"विमानतळ झाल्‍यास मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत होईल तसेच पुणे, मुंबई या मेट्रो सिटीतील वाहतूक, रहदारी यातून सुटका होईल. विमानतळामुळे नाशिकमधील छोट्या गावांचाही विकास होण्यास मदत होईल. यामुळे नाशिकची आर्थिक स्‍थिती सुधारेल. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तर अतिशय सोयीचे होईल. तसेच, मर्यादित सुटीचा उपयोग आपल्‍या कुटुंबांसोबत घालण्याचा मानस प्रत्‍यक्षात सोयीमुळे साध्य करता येईल."

- उमा शुक्‍ल, व्यावसायिक

"नाशिक हे औद्योगिक क्षेत्र असून, मोठया कंपन्या नाशिकमध्ये आहे. यामुळे व्यावसायाच्या दृष्‍टीने परदेशाशी संबंध येत असतो. आंतरराष्‍ट्रीय विमानतळामुळे व्यावसायिकांना खूप सोयीचे व फायद्याचे होणार आहे. यामुळे आर्थिक व्यवस्‍थेवर सकारात्‍मक परिणाम होईल, तसेच देशाचा फायदा होईल. नाशिकचा विस्‍तारही वाढतो आहे. यामुळे येथील उद्योगधंदे, शिक्षणक्षेत्रातही भर पडत आहे. विमानतळ हे सगळ्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती घडवून आणेल. देशातील नाशिकचा दर्जा वाढेल." - जान्हवी देशपांडे, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT