army 1_0.jpg 
नाशिक

सैन्‍य दलातील करिअरसोबत देशसेवेचीही संधी; 'या' समवेत अन्‍य परीक्षांतून घेता येणार प्रवेश

अरुण मलाणी

नाशिक : सैन्‍य दलातील अधिकारी-जवानांच्या शौर्य, पराक्रमाचा प्रत्‍येक भारतीयाला अभिमान असतो. चांगले करिअर करण्यासोबत देशसेवेची संधी सैन्‍यदलात भरती होऊन करता येऊ शकते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) समवेत अन्‍य विविध परीक्षांच्‍या माध्यमातून सैन्‍यदलात दाखल होण्याच्‍या संधी उपलब्‍ध झाल्या आहेत. गेल्‍या काही वर्षांमध्ये सैन्‍यात दाखल होण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्‍सुकताही वाढत आहे. 

केवळ मुलांसाठी हा पर्याय खुला

सैन्‍यदलात दाखल होण्यासाठी सर्वांत लोकप्रिय व माहिती असलेला पर्याय म्‍हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी होय. बारावीनंतर उपलब्‍ध या पर्यायां करिता यूपीएससीच्‍या मार्फत परीक्षा घेतली जाते. वायुसेना व नौसेनेत भरतीकरिता विज्ञान शाखेतील बारावीपर्यंतचे शिक्षण गणित व भौतिकशास्‍त्र विषयासह झालेले असणे व गुणांची पात्रता पूर्ण करणे आवश्‍यक असते. भूदलाकरिता कला, वाणिज्‍य व विज्ञान अशा तिन्‍ही शाखांतील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतात. बारावीनंतर १० प्‍लस २ टेक्निकल एंट्री स्‍कीमअंतर्गत आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेता येऊ शकतो. पुणे, सिकंदराबाद, महू अशा तीन ठिकाणी हे महाविद्यालय आहे. बारावी विज्ञान शाखेत पीसीएम ग्रुपमध्ये सत्तर टक्क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीतून प्रवेशाची संधी असून, केवळ मुलांसाठी हा पर्याय खुला आहे. 

अन्‍य विविध परीक्षांतून प्रवेशाची संधी उपलब्‍ध

नेव्‍ही इंजिनिअरिंगकरिता पीसीएम ग्रुपमध्ये सत्तर टक्‍के गुणांसह जेईई मेन्‍स परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे व मुलाखतीद्वारे निवड केली जाते. पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथून बारावी विज्ञान शाखेनंतर एमबीबीएस वैद्यकीय पदवी शिक्षण घेण्याची संधी असून, ‘नीट’ परीक्षेद्वारे प्रवेश मिळविता येतो. मुले व मुलींनाही प्रवेशाचा पर्याय खुला आहे. 

'एसपीआय'द्वारे तयारीची संधी 

'एनडी' एमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी औरंगाबाद येथील ‘एसपीआय’ हा उत्तम पर्याय उपलब्‍ध आहे. या संस्‍थेत अकरावी, बारावी विज्ञान शाखेसोबत एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या संस्‍थेतून ‘एनडीए’ करिता निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. दहावीत शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेशासाठी 'एसपीआय'साठी प्रवेश परीक्षा देता येऊ शकते. 

सध्याच्‍या कोरोनाच्‍या संकटात नोकरीच्‍या शाश्‍वतीबाबत युवकांमध्ये असुरक्षित वातावरण आहे. सैन्‍यदलात देशसेवा केल्‍याचे समाधान मिळते, सोबत नोकरीची हमीदेखील आहे. मुलींनादेखील आता वैमानिकापासून अन्‍य विविध पदांसाठीच्‍या संधी खुल्‍या झाल्‍या आहेत. चांगला करिअरचा पर्याय असला, तरी कष्ट घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शालेय जीवन किंवा किमान अकरावीपासूनच तयारी करणे आवश्‍यक आहे. - हर्शल आहेरराव, 
संस्‍थापक, सुदर्शन ॲकॅडमी

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT