admission to agricultural courses esakal
नाशिक

Agriculture Course Registration : कृषी अभ्यासक्रम नोंदणीसाठी उद्यापर्यंत संधी

सकाळ वृत्तसेवा

Agriculture Course Registration : राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत कृषी शिक्षण विभागांतर्गत कृषी व कृषी संलग्‍न पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेत पुन्‍हा मुदतवाढ दिली आहे. (Opportunity till tomorrow for agriculture course registration nashik news)

सोमवारी (ता.१६) मुदत संपत असताना, दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्‍याने, आता पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत गुरुवार (ता.२०) पर्यंत असेल. कृषी व कृषी संलग्‍न पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २४ जूनला प्रक्रिया सुरु झाली होती.

यापूर्वी एकदा मुदतवाढ दिल्‍यानंतर पुन्‍हा मुदत वाढविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. आता पात्रताधारक विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत नोंदणी करता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्‍यान यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ही या वाढीव मुदतीत येत असल्‍याने पुढील संपूर्ण वेळापत्रकात बदल होणार आहे.

सीईटी सेलने अद्याप सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नसून, नोंदणीची मुदत संपल्‍यानंतर प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT