old nashik.jpg 
नाशिक

'या' कारणाने व्यापारी अन् मनपा कर्मचाऱ्यांत रंगला वाद...मग नंतर

युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) शहरात सहा दिवसांसाठी केलेला लॉकडाउन पूर्ण झाला तरी पोलिस, महापालिका कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास विरोध केला आहे. व्यवसाय सुरू करण्याची मागणी करीत व्यावसायिक एकत्र झाले असून त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांची भेट घेतली. सविस्तर प्रकार असा की...

व्यापारी-मनपा कर्मचाऱ्यांत वाद

काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. जुने नाशिक भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. तरीही पोलिसांनी लॉकडाउन करून येथील व्यावसायिकांना सहा दिवसांसाठी व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. व्यावसायिकांनी प्रतिसाद देत १०० टक्के व्यवसाय बंद ठेवले होते. मंगळवारी (ता. २१) सहा दिवस पूर्ण झाले. बुधवारी (ता. २२) फाळके रोडवरील व्यावसायिकांनी दुकाने उघडण्यास गेले असता पोलिसांनी दुकान बंद करण्यास सांगितले. व्यावसायिकांनी त्यांना विरोध करत व्यवसाय सुरू केले. गुरुवारी (ता. २३) महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा आग्रह धरला. सहा दिवसांचे लॉकडाउन म्हणत गुरुवारी आठ दिवस झाले. तरीही व्यवसाय सुरू करू देत नसल्याने चौकमंडई, बागवानपुरा, फाळके रोड येथील व्यावसायिकांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठत सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांची भेट घेतली. 

महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा

दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. उपासमारीची वेळ आली आहे. सहा दिवसांचे लॉकडाउनचे काटेकोर पालन केले तरी हा अन्याय का, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी समजूत काढत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील लॉकडाउनच्या सूचनांबाबत व्यावसायिकांना माहिती देण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना संपूर्ण माहिती देण्यास सांगितल्यानंतर वाद मिटला.

पोलिसांची मध्यस्थी

पुढील सूचना येईपर्यंत व्यवसाय सुरू न करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. काही हॉटेलचालकांनी माल तयार करून ठेवला होता. त्यांनी तसेच काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आणि भाजीपाला व्यावसायिकांनी असे वीस ते तीस टक्के व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय दुपारनंतर सायंकाळ पाचवाजेपर्यंत सुरू केल्याचे चित्र दिसले.

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : क्षुल्लक माणसे माझ्या प्रसिद्धीचा आधार घेऊ शकत नाहीत - कंगना रणौत

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT