students esakal
नाशिक

Nashik : संचमान्यतेसाठी अवैद्य आधारावर पडताळणीचा पर्याय; शाळांना दिलासा मात्र 90 टक्के वैधचा स्पीडब्रेकर

संतोष विंचू

Nashik News : शाळेची शिक्षक संख्या टिकविण्यासाठी गेले पाच-सहा महिने शालेय दप्तर व विद्यार्थ्यांची आधार वरील माहिती जुळवाजुळवीसाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या राज्यातील शाळा व शिक्षकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

शाळेचा संबंध नसताना आधारकार्डवरील चुका शाळेच्या माथी लावणे चुकीचे असल्याने या विरोधात आवाज उठविला गेल्याने अखेर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पटावर असलेल्या आणि १५ जून २३ रोजी आधार वैद्य ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यता करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अर्थात यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे आधार अवैद्य आहे त्यांची शाळात पडताळणी होणार आहे. (Option of verification on non medical basis for accreditation Relief to schools but 90 percent valid speed breaker Nashik)

आधार मिसमॅच असलेले विद्यार्थी आधार शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे जुळवा व स्टुडन्ट पोर्टलवर ते दाखवा असा अजब फतवा काढला आहे किंबहुना असे दोन्हीही रेकॉर्ड मॅच झालेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरले जातील, असा सज्जड इशारा दिल्याने आपल्या शाळेतील शिक्षक संख्या कमी होऊ नये, यासाठी गेल्या चार-पाच महिन्यापासून संस्थाचालक, शिक्षक आटोकाट प्रयत्नात होते.

किंबहुना अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांना स्वतः आधार केंद्रावर घेऊन जाऊन या दुरुस्त्या करण्याची वेळ आली होती. काही विद्यार्थ्यांच्या आधारमधील दुरुस्ती होत नसल्याने शाळांनी व शिक्षकांनी वैतागून हात टेकविले होते. या सगळ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आज घेतलेल्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आज काढलेल्या पत्रामुळे शाळा व शिक्षकांना तात्पुरता आधार मिळाला आहे.

आता ३० नोव्हेंबर २२ रोजी स्टुडंन्ड पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ जूनअखेर आधार वैद्य असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत किमान ८० टक्के विद्यार्थी वैद्य आहे असे गृहीत धरून संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे किंवा इतर कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील व संच मान्यतेतील मंजूर पदावर परिणाम होत असेल तर अशा शाळांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांच्या नावाचा अर्ज करावा लागेल. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे त्या संदर्भात पडताळणी करणार आहे.

"विद्यार्थ्यांच्या सुरवातीला झालेल्या आधारमधील चुकी हेच मिसमॅच दिसण्याचे मूळ कारण आहे. त्यामुळे संच मान्यता करताना विद्यार्थ्याचे आधार कार्ड विचारात घ्यावे. स्टुडंन्ट पोर्टलला विद्यार्थी संख्या दिसत असून शिक्षण विभागाने पडताळणीचा घाट न घालता शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापकावर विश्वास ठेवावा. मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेली सर्व विद्यार्थी ग्राह्य धरावी. एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची काळजी घ्यावी."

- एस. बी. देशमुख, राज्यसचिव, मुख्याध्यापक संघटना

"विद्यार्थ्यांचे व शाळेचे हित विचारात घेऊन शिक्षकांनी आटोकाट प्रयत्न करत आधार दुरुस्त्या केल्या आहेत. मुळात हे काम शिक्षकांचे नाही त्यामुळे ज्यांच्या आधारमध्ये चुका आहेत, त्या दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे उपक्रम राबवावा आणि शाळेत दाखल असलेला प्रत्येक विद्यार्थी गृहीत धरूनच यापुढेही संचमान्यता कराव्यात." - अनिल साळुंके, शिक्षक नेते, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT