quarantine order.jpg 
नाशिक

#Lockdown : पायी येणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचे आदेश; वैद्यकीय तपासणी करून आवश्‍यकतेनुसार करणार औषधोपचार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर कष्टकरी, हातावरचे पोट असलेले कामगार सैरभैर झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर अथवा जिल्ह्यातील सीमेवर येणाऱ्या प्रवाशांच्या कार्यवाहीचे आदेश आरोग्य विभागाने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्ह्यांमध्ये क्वारंटाइनमध्ये ठेवून आवश्‍यक मूलभूत सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे.

सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्‍यकतेनुसार औषधोपचार

महाराष्ट्रातील आणि काही कारणांमुळे परराज्यात गेलेले प्रवासी, स्थलांतरित कामगार, बेघर आदी राज्यात परत येत आहेत. त्यातील बरेचसे जण पायी अथवा आडमार्गाने येत आहेत. या प्रवाशांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन कार्यवाहीला सुरवात करण्यात आली. परराज्यातून आलेले प्रवासी, स्थलांतरित कामगार व बेघरांना महसूल विभागाने दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणी आणल्यानंतर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना द्यावयाच्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्‍यकतेनुसार औषधोपचार करायचे आहेत. गरोदर माता, बालकांची विशेष काळजी घ्यायची आहे. 

आरोग्य शिक्षण द्यायचे 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाश्‍यांना कोविड-19 आजार व आजाराच्या प्रतिबंधासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक घ्यावयाची काळजी, याबाबत आरोग्य शिक्षण द्यायचे आहे. प्रवाशांमध्ये ताप (शंभर फॅरेनाइटच्या पुढे), खोकला, धाप लागणे अशी लक्षण असणारे प्रवाशांना पुढील तपासणीसाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवायचे आहे. जिल्हा रुग्णालयात संशयितांना कक्षात दाखल करावयाचे आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठवायचा आहे. अहवाल सकारात्मक आल्यास तत्काळ आयसोलेशन कक्षात दाखल करायचे. अहवाल नकारात्मक आल्यास महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे. 

ठळक उपाययोजना 

- रुग्णांची चाचणी सकारात्मक आल्यास त्यांच्या सहवासातील सर्वांची माहिती घ्यायची. त्यांना स्वतंत्रपणे चौदा दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवावे. लक्षणे आढळून आल्यास पुढील कार्यवाही करावी. 
- पाचशेपेक्षा अधिक प्रवाशी एका ठिकाणी असल्यास तेथे बहुविध आरोग्यसेवक (पुरुष) यांना 24 तास उपलब्ध ठेवायचे आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT