dagdusheth ganpati history
dagdusheth ganpati history 
नाशिक

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती मूळचा नांदगावचा; विस्मरणाआड दडलेली कहाणी

संजीव निकम

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना आज लोकमान्य टीळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.

गणेशोत्सवाची सोशल मीडियावर सध्या पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचा बोलबाला सुरू आहे. पुणे गणेशोत्सव व दगडूशेठ हलवाई असा संदर्भ येत असल्याने नांदगावकरांचा ऊर अभिमानाने भरून येतो, अर्थात त्याला कारणही तसेच आहे. दगडूशेठ हलवाई मूळचे नांदगावकर असल्याची पार्श्वभूमी त्यामागे आहे. पुण्यातील हलवाई कुटुंबाचे नांदगाव आणि येथील हलवाई गल्लीशी यामागे विस्मरणाआड दडलेली मोठी कहाणी आहे. 

dagdusheth ganpati history

हे कुटुंब मूळ नांदगावचे

(कै.) दगडूशेठ हलवाई मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे. मालेगाव रस्त्याकडे मोहमायादेवी   (महम्मा देवी)  मंदिरासाठी  तत्कालीन सरकारकडून जुन्या सर्व्हे क्रमांक ३२० च्या नोंदीनुसार २०-२२ एकर जमीन असल्याची नोंद आहे. येथील गांधी चौकात हलवाई गल्लीत त्याचे घर आहे. वडिलोपार्जित मिळकतीच्या नोंदी आहेत.

नांदगावच्या गांधी पुतळ्यामागे असलेल्या हलवाई गल्लीत पडझडीला आलेल्या एका वाड्यात कधीकाळी दगडूशेठ कुटुंब राहायचे. त्यांच्या कुटुंबाच्या निगडित स्थावर मिळकती वर अभिलेखात हे कुटुंब मूळ नांदगावचे होते याचे दाखले मिळतात. (कै.) दगडूशेठ यांच्या पाचव्या पिढीत आपले पणजोबा दगडूशेठ असल्याचा अभिमान आहे. हलवाई गल्ली या भागात परिचित होती. अलीकडे पुण्याहून काही मंडळी फेब्रुवारी महिन्यात नांदगावला येऊन गेली. 

नांदगावकरांसाठी अभिमानास्पद

नांदगावचा इतिहास फार पुरातन नसला तरी हलवाई  गल्लीच्या निमित्ताने या गावात मध्य प्रदेशातून कायस्थ मंडळी आली. विविध प्रकारच्या मिठाया  बनविणे हा  प्रामुख्याने व्यवसाय असल्याने त्यांची हलवाई  म्हणून ओळख पडली व त्यांच्या वास्तव्य असलेल्या वाडा व परिसराला हलवाई गल्ली असे नामकरण झाले. दगडूशेठ हलवाई यांच्या वंशावळीत प्रथम मूळपुरुष म्हणून रामाजीशेठ श्रीवास्तव यांच्यापासून सुरू होते. त्यांना गोविंदशेठ व गोपाळशेठ अशी दोन मुले. गोविंदशेठ यांच्यानंतर दगडू शेठ यांच्या पिढीचा वारसा सुरू होऊन सध्याच्या पाचव्या पिढीतील अनेकांपर्यंत पोचतो.

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या नांदगावमधील आप्तेष्टांना त्यामुळेच सन्मानाची वागणूक मिळते. एकेकाळी दूधदुभत्याचे नंदनवन असलेली नांदगाव नगरी त्या काळातील हलवाई मंडळींना पोषक ठरली. विद्यमान स्थितीत न्यायडोंगरीची प्रसिद्ध बालूशाही अवघ्या पुण्याला त्यामुळे भुरळ घालते. गणेशोत्सव व दगडूशेठ असा अन्वय अतूट असल्याने गणेशोत्सव काळात दगडूशेठ गणपतीच्या होणाऱ्या उल्लेखासोबत नांदगावकर माणूस हुरळून जातो. 

आप्तेष्टांना विश्वस्त मंडळींकडून सन्मानाची वागणूक

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेलेल्या नांदगावमधील आप्तेष्टांना विश्वस्त मंडळींकडून त्यामुळेच सन्मानाची वागणूक मिळत असते. पुण्याला गेलेल्या दगडूशेठ यांच्या मुलांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला असे मानले जाते. मात्र त्यांनी आपल्याच वंशावळीत गोविंदशेठ यांना दत्तकविधान दिले व पुढे या गोविंदशेठ यांच्यापासून दत्तूशेठ असा प्रवास आहे. सध्या या मिळकती व त्याच्यासाठी विजय कायस्थ पाठपुरावा करीत आहेत. गांधी चौकात हलवाई गल्लीत त्यांचे घर आहे. वडिलोपार्जित मिळकतींच्या नोंदी काढीत अनेक बाबी व महत्त्वाचा दस्तऐवज त्यांच्याकडे आहे. 

संपादन - किशोरी वाघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT