नाशिक : ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी ठरवलेली मॅकमोहन लाईन नक्की माहीत नसून चायना व भारताचा दृष्टीकोन मॅकमोहन लाईनकडे पाहण्याचा वेगळा आहे. आपली सरहद्द काय आहे आणि कोणती आहे हे माहीत नसल्यामुळे भारत व चीन दरम्यान सध्या वाद होत आहे. मार्किंग होत नाही तोपर्यंत ही भांडणे सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन भारत चीन सीमेवर आपली सेवा बजावलेले नाशिकचे निवृत्त ब्रिगेडियर अरविंद वर्टी आणि लेफ्टनंट कर्नल वैभव गोखले यांनी सकाळ'शी बोलताना केले.
सीमांच्या हद्दी सुरक्षित करायला हव्यात
1957 ते 1989 दरम्यान ब्रिगेडियर वर्टी यांनी भारतातल्या विविध सीमा रेषांवर आपली सेवा बजावली आहे. 1981 ते 83 दरम्यान भारत-चीन सीमेवर त्यांनी यशस्वी संचालन केले आहे. 1962 मध्ये पहिली चीन भारत लढाई झाली त्यानंतर 1968 ला लहान लढाई झाली गोळीबार व फायरिंग करायची नाही हा आंतरराष्ट्रीय नियम दोन्ही देशांनी पाळलेला आहे मॅकमोहन लाईन ही ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी ठरवून दिली होती. मात्र भारत व चीन चा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे ही भांडणे सुरू आहेत. चायना बॉर्डर ही अरुणाचल, सिक्कीम हिमाचल, उत्तराखंड व लडाख या सीमा रेषांना लागलेली आहे म्हणून या सीमांच्या हद्दी सुरक्षित करायला हव्यात यासाठी सैन्यदलातील कोर व डिव्हिजन वाढवले पाहिजे. लेहपासून तर दौलत बेग ओल्डी हा 255 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचे काम चालू आहे.
युद्धाची झळ दोन्ही देशांना सोसावी लागणार
हा भारतापासून बांधत चाललेला रस्ता चीनच्या हद्दीला जोडला जात आहे. हा रस्ता करायला चीनचा विरोध आहे. मात्र तरीही हा रस्ता आपला भारत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा वाद सामंजस्याने मिटला पाहिजे. दोन्ही बाजूंनी संयम राखला गेल्यास दोन्ही देशांचा फायदा आहे. चायनाच्या कोणत्याही धमकीला भारत बी घालणार नाही. आपली आर्मी 1962 ची राहिलेली नाही. त्यामुळे सक्षमपणे तोंड देण्यासाठी भारत केव्हाही तयार आहे. मात्र युद्ध झाल्यास दोन्ही देशांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. म्हणून हा वाद सामोपचाराने मिटला पाहिजे असे मत ब्रिगेडियर अरविंद वर्टी यांनी दैनिक 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
सैन्य वाढवून बॉर्डर सुरक्षित करा : लेफ्टनंट कर्नल वैभव गोखले
चीनचे आपले व्यापारी व सांस्कृतिक संबंध विकसित झाले आहे. चिनी लोक चकवा देत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही म्हणून सामंजस्याने हा वाद मिटल्यास दोन्ही देशांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने सैन्य वाढवून बॉर्डर सुरक्षित करायला हव्यात. लेफ्टनंट कर्नल वैभव गोखले यांनी भारत- चीन सीमेवर 1970-71 व 1979-81 या काळात सेवा बजावली असून, ते नाशिकचे रहिवासी आहेत. भारताने चीनच्या व्यापारी गोष्टींवर बहिष्कार टाकायला हवा. स्वदेशी माल स्थानिकांनी विकत घ्यायला हवा. भारत-चीन हे सामंजस्याने हद्द ठरवून हा वाद मिटवायला हवा. दोन्ही देशांना युद्ध न परवडणारे आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे सामाजिक, आर्थिक नुकसान होणार आहे. चीनचे जवान हळूहळू भारताच्या हद्दीत यायला लागले आहेत.
"मेक इन इंडिया'कडेच भारतीयांनी वळायला हवे
चीन विश्वसघात करत असेल तर तोडीस तोड उत्तर द्यायलाही वेळप्रसंगी हरकत नाही. सध्याच्या कोरोनामुळे जगातले बरेच देश जेरीस आले आहेत. त्याचे खापर चीनवर फुटत आहे म्हणून पुन्हा "मेक इन इंडिया'कडेच भारतीयांनी वळायला हवे. भारताची परिस्थिती कायमच सामंजस्याची राहिलेली आहे. त्याचा फायदा चीन उठवत असल्यामुळे सध्या कायमस्वरूपी शाश्वत या प्रश्नांवर इतर देशांची मदत घेऊन उपाययोजना करायला हवी. तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारताचे सैन्य केव्हाही चीनच्या वरचढच राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.