corona.jpg 
नाशिक

दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा 770 वर, तर 459 रुग्ण कोरोनामुक्त!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 770 झाली असली, तरी यांपैकी आतापर्यंत 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक असून, यामध्ये सर्वाधिक 384 रुग्ण मालेगावातील आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, महिलेसह तिच्या बाळाला कोणतीही लक्षणे नाहीत. ही बाब जिल्हावासीयांसाठी सर्वाधिक दिलासादायक आहे.

लक्षणे नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत 121 रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत 16 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.  तर शुक्रवारी (ता.15) सकाळी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 770 झाली. पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये मालेगावातील 11, ओझर व येवल्यात प्रत्येकी एक, तर नाशिक शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक प्रकारे भीतीही निर्माण झाली होती; परंतु आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेल्या उपचारांना सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची वाढती संख्या जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत 459 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून, यात सर्वाधिक 377 रुग्ण मालेगावातील आहेत. आजमितीस मालेगावात 177, तर जिल्ह्यात 258 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 33 रुग्णांचा बळी गेला आहे. नवीन डिस्चार्ज पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 168 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करीत घर गाठले आहे. यात, मालेगावातील 132, नाशिक शहरातील दोन, उर्वरित ग्रामीण भागातील 18 आणि परजिल्ह्यातील 16 रुग्णांचा समावेश आहे. 

शहरात दोघे पॉझिटिव्ह 

नाशिक शहरात गुरुवारी (ता. 14) दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यातील एक 35 वर्षीय पुरुष पाटीलनगर, सिडको येथील आहे. याच परिसरात यापूर्वीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे, तर आनंदवली परिसरातील बाळंतीण कोरोनाग्रस्त असली, तरी तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट अद्याप मुख्य कोरोना कक्षाकडे प्राप्त झालेला नाही; परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्याची नोंद झालेली आहे. या बाधित महिलेसह तिच्या तीन दिवसांच्या बाळास अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तसेच बाळाची चाचणी करण्यात आलेली नाही; परंतु वैद्यकीय अधिकारी दोघांवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय, गुरुवारी दिवसभरात 16 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली, तर गेल्या 24 तासांमध्ये 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यात मालेगावातील 132 रुग्णांचा समावेश आहे. तर शुक्रवारी (ता.15) सकाळी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 

 * जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित : 770

* मालेगाव : 600
* नाशिक : 42 
* उर्वरित ग्रामीण : 95 
* अन्य जिल्ह्यांतील : 30 
* कोरोनाचे बळी : 33 
* कोरोनामुक्त : 459  

मालेगावातील परिस्थिती सुधारत आहे. पूर्वी शंभर रिपोर्ट आले की त्यात 25/30 पॉझिटिव्ह असत. आता हे प्रमाण आठ-दहाने घसरले आहे. नवीन डिस्चार्ज पॉलिसीनुसार 250 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. येत्या काळात यात आणखी सुधार दिसेल, अशी अपेक्षा आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT