oxygen Cylinder blast in Shantiniketan Chowk area on Gangapur Road nashik news 
नाशिक

Nashik Cylinder Blast: सिलिंडरच्‍या स्‍फोटाने हादरला गंगापूर रोड; परिसरातील सदनिका, वाहनांचेही मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cylinder Blast: ऑक्‍सिजन सिलिंडरची वाहतूक करत असलेल्‍या पिकअपमधील सिलिंडरचा गंगापूररोडवरील शांतिनिकेतन चौक परिसरात स्‍फोट झाला. शनिवारी (ता.९) सायंकाळी पावणे सहाच्‍या सुमारास झालेल्‍या स्‍फोटाचा आवाज कानठळ्या बसविणारा होता.

कुणालाच काही समजत नसल्‍याने काही मिनिटांसाठी भितीचे वातावरण पसरले होते. स्‍फोटामुळे परीसरातील इमारतींसह काही वाहनांचे नुकसान झाले असून, पिकअपच्‍या चालकाला दुखापत झाली आहे.

चोपडा लॉन्‍सकडून प्रसाद सर्कल भागातील ट्युलिप हॉस्‍पिटल येथे पिकअप (एमएच १५ डीके ५१८४) मधून ऑक्‍सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यात येत होती. (oxygen Cylinder blast in Shantiniketan Chowk area on Gangapur Road nashik news)

यादरम्‍यान शांतिनिकेतन चौक, डीकेनगर भागात गतिरोधकाजवळ पिकअपमधील सिलिंडर हवेत उसळून, यापैकी एका सिलिंडरचा स्‍फोट झाला.

या स्‍फोटाचा आवाज इतका तीव्र होता, की थेट आनंदवल्‍लीपर्यंत काहींनी आवाज अनुभवल्‍याचे सांगण्यात आले. दरम्‍यान घटनेनंतर सिलिंडरने पेट घेतल्‍याने काळ्या कुट्ट धुराचे लोळ परिसरात पसरले होते. काही क्षणांसाठी कुणालाच काही न कळाल्‍याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र काही मिनिटांनी नागरिकांनी परिस्‍थितीचा अंदाज घेत मदतकार्याला सुरवात केली.

वाहनासह दुकान, इमारतीचे नुकसान

पिकअपमागे चाललेल्‍या चारचाकी वाहनाची तसेच त्‍यामागे असलेल्‍या रिक्षाच्‍याही काचा या दुर्घटनेत फुटल्‍या. इतकेच नव्‍हे तर परिसरातील ऋषिराज सोसायटीतील तिसऱ्या मजल्‍यापर्यंतच्‍या सदनिकांच्या काचा फुटल्‍या. या दुर्घटनेत काहींना दुखापत झाल्‍याची माहिती मिळते आहे. दरम्‍यान या घटनेबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्‍हा दाखल करण्यात आला.

स्‍फोट अन्‌ थरार..

* वर्दळीचे ठिकाण असल्‍याने नागरिकांची धावपळ.

* आवाजाने नागरिकांच्‍या कानठळ्या बसविल्या.

* काळ्या धुरामुळे काही मिनिटांसाठी दाटला अंधार

* पिकअप चालकाच्‍या डोक्‍यासह कानाला गंभीर दुखापत

* एटीएमच्‍याही काचा फुटल्‍या, दुकानांचे किरकोळ नुकसान

"सिलिंडरच्‍या स्‍फोटाचा आवाज भयंकर होता. अनेकांनी थेट आनंदवल्‍लीपर्यंत आवाज ऐकल्‍याचे सांगितले. स्‍फोट झाल्‍यावर वाहनाभोवती मोठा धूर झालेला होता. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत बचावकार्य केले." - सुधीर धुमाळ, प्रत्‍यक्षदर्शी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT