ozar21.jpg
ozar21.jpg 
नाशिक

ग्रामविकास अधिकाऱ्यांचा रौद्रावतार! 4 लाख 10 हजार रुपयांची तडकाफडकी वसुली

उत्तम गोसावी

नाशिक : (ओझर) येथील ग्रामपालिकेच्या मालकीच्या जागेवर बांधलेले गाळे भाडेतत्वावर दिलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांची थकबाकी वाढल्यामुळे ग्रामपालीका प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसले. ग्रामसेवकांच्या रौद्रवतार बघून अनेकांना तुकाराम मुंडेंचीच कार्यपद्धती आठवली.

चार लाख दहा हजार रुपयांची तडकाफडकी वसुली

वाढत चाललेल्या जुन्या थकबाकीमुळे ग्रामपालिका अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांना वसुली करण्यासाठी मागे लागली होती. त्यात अनेकांनी येऊन ती भरली देखील. शेवटी उरलेल्या 37 गाळे धारकांना येथील ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यास 29 जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत रकमा जमा केल्या. उरलेल्या आठ जणांवर नोटिशीची मुदत संपल्यावर ग्रामविकास अधिकारी देवकर यांनी आपला मोबाईल बंद करून कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करायला गुरुवारपासून सुरवात केली. त्यात मटण मार्केट येथील पाच, प्रियदर्शनी येथील एक तर खंडेराव मंदिर जवळ दोन अशा 8 गळ्यांना सील केले. 

भाडेकरूंची प्रशासनाबरोबर बाचाबाची

यावेळी काही भाडेकरूंची प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली. देवकर यांनी ठाम पवित्रा घेतल्याने सील झालेल्या दुकानदारांनी एकूण चार लाख दहा हजार रुपये आणून भरले. नंतर सगळ्यांची दुकाने उघडण्यात आली. यासर्व प्रकरणी दुपारनंतर ओझर शहरात एकच चर्चा घडली. या कारवाईत सुभाष शेजवळ, दिलीप ठुबे, संतोष सोनवणे, योगेश गोरे, तुकाराम गवळी, सतीश सोनवणे यांच्यासह ग्रामपालिका कर्मचारी सहभागी झाले होते. 

मार्च एन्डला कोरोना लॉकडाऊन झाल्यानंतर ग्रामपालिकेची आर्थिक स्थिती त्यावेळी केलेल्या उपाययोजनामुळे काहीशी बिघडली. उत्पन्नाचे स्रोत असतानाही अनेक लोक ते भरण्यास टाळाटाळ करत होते. काही दिवसात पाणी आणि घरपट्टी वसुलीसाठी देखील अशीच वसुली मोहीम हाती घेणार आहे. - दत्तात्रय देवकर, ग्रामविकास अधिकारी,ओझर.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT