Padmashri Dr Shashank Joshi esakal
नाशिक

SAKAL Exclusive | भारत व्‍हावे Diabetes Care Capital! : पद्मश्री डॉ. शशांक जोशी

काळजीअभावी २५ टक्‍के लोकसंख्या मधुमेहाची शिकार होण्याचा धोका

अरुण मलाणी

नाशिक : साधारणतः २०११ मध्ये भारत मधुमेहाची राजधानी बनला होता. परंतु सध्या सर्वाधिक रूग्णसंख्येमुळे चीन मधुमेहाची राजधानी आहे. परंतु भारतासाठी भीती टळलेला नसून, भारतीयांनी सजग राहून मधुमेहाचा मुकाबला करणे आवश्‍यक आहे.

सध्या मधुमेहाचे प्रमाण १५ टक्‍यांपर्यंत पोचले असून, भविष्यात २५ टक्‍के लोकसंख्या मधुमेहाचे शिकार होण्याचा धोका आहे.

आजारावर नियंत्रण आणताना मधुमेहाची जागतिक राजधानी होण्याऐवजी भारत 'डायबेटिस केअर कॅपिटल' म्‍हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी 'सकाळ'शी बोलताना व्‍यक्‍त केली. (Padmashri Dr Shashank Joshi statement India should be Diabetes Care Capital SAKAL Exclusive nashik news)

डॉ. जोशी म्‍हणाले, भारतात प्रामुख्याने शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, याचे प्रमुख कारण जीवनशैलीत झालेला बदल आहे. महाराष्ट्र राज्‍याचा विचार केल्‍यास अधिक प्रमाणात जागरूकता आढळून येते. मधुमेहाच्या रूग्‍णांबाबत महाराष्ट्र मधोमध आहे. चुकीच्‍या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचा धोका बळावत आहे.

वेळीच सुधारणा करणे आवश्‍यक आहे. पोटाचा घेर पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटर तर महिलांमध्ये ऐंशी सेंटीमीटरहून अधिक असेल, अशा व्‍यक्‍तींनी योग्‍य तपासण्या करून आपल्‍याला मधुमेह आहे का, याची खात्री करून घ्यावी. योग्‍य मधुमेह तज्‍ज्ञांच्‍या निगराणीत उपचार घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

तरुणांमध्ये वाढते प्रमाण

एकूण मधुमेहींपैकी पूर्वी २ ते ३ टक्‍के रुग्‍ण तरुण वयोगटातील होते. सध्या हे प्रमाण दहा टक्‍यांपर्यंत पोहोचले आहे. युवा पिढीत वाढता तणाव याचे प्रमुख कारण आहे. याशिवाय कार्यालयीन कामानिमित्त बैठी जीवनशैली असल्‍याने यामुळे धोका वाढतो आहे. बदलता आहार मधुमेहाला निमंत्रण देत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

निम्‍या रुग्‍णांना कल्‍पनाच नाही

प्रत्‍येकी दोन मधुमेहींपैकी एकाला अर्थात निम्‍या रुग्‍णांना आपल्याला मधुमेह असल्‍याची माहितीच नाही. मधुमेहात विशेष अशी लक्षणे दिसून येत नसल्‍याने आरोग्‍याची तक्रार निर्माण झाल्‍यावर केलेल्‍या चाचण्यांनंतर अनेक रुग्‍णांना मधुमेहाबाबत माहिती मिळत असल्‍याचे निरीक्षण डॉ.जोशी यांनी सांगितले.

त्‍यामुळे वयाच्‍या चाळीशीनंतर नियमित तपासणी करताना व शरीरात काही ठराविक लक्षणे जाणवल्‍यानंतर डॉक्‍टरांच्‍या सल्ल्याने चाचणी करून घेण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

जगात स्वस्‍त औषधे भारतात

मधुमेह उपचार पद्धतीत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मधुमेह उपचारात वापरली जाणारी बहुतांश औषधे जगातील अन्‍य देशांच्‍या तुलनेत भारतात सर्वाधिक स्‍वस्‍त आहेत. त्‍यामुळे उपचारात हलगर्जीपणा न करता नियमित व तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार घेण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

डॉ. जोशी म्‍हणाले...

* सिटींग इज नेक्‍ट स्‍मोगिंग, अर्थात बैठे काम धुम्रपानाइतके धोकादायक.

* बैठे काम करणाऱ्यांनी दर अर्धा तासाने किमान पाच मिनिटे चालावे.

* टाईप-२ प्रकाराचा मधुमेह योग्‍य उपाययोजनांनी बरा होऊ शकतो.

* वारंवार तहान, सारखी भूक लागणे, लघवीचे अधिक प्रमाण या

लक्षणांकडे दुर्लक्ष नको.

* नियमित व्‍यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची.

* तणावमुक्‍त जीवन जगताना मधुमेहाला ठेवा दूर.

* शासनाने चाचणीचे प्रमाण वाढवत अधिकाधिक लोकसंख्या तपासणीवर द्यावा भर.

* आजार झाल्‍यावर उपचार घेण्यापेक्षा मधुमेह टाळण्याला द्यावे प्राधान्‍य.

* मधुमेह झाल्‍यास घाबरून न जाता तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनात घ्यावे उपचार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT