nashik ats action 1.jpg
nashik ats action 1.jpg 
नाशिक

पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठसाठी लंडनहून ट्रॅप! पोलीस आय़ुक्तांचे जागरुक राहण्याचे आवाहन 

विनोद बेदरकर

नाशिक : हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमीटेड (एचएएल) मधील दीपक शिरसाठ तसेच तोफखाना केंद्रातील मजूर संजीवकुमार हे दोघेही पाकिस्तानी कटकारस्थानांना सहज बळी पडले. नाशिकमध्ये कुणाभोवतीही सापळा लावला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी दूरध्वनीबाबत जागरूकपणे वागा, विशेषतः ग्रुप ॲडमिनने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले. 

अलगद जाळ्यात फसल्याचे चित्र
नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्त्वाच्या आस्थापना असून, महिनाभरात दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात दोघेही निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे. शहरातील या दोन्ही घटनांबाबत पोलिस आयुक्तांनी गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषद घेऊन निवेदन केले. 

दीपक शिरसाठसाठी पाकिस्तानचा लंडनहून ट्रॅप 

पांडे म्हणाले, की महिनाभरातील नाशिकमधील दोन्ही घटना बघता पाकिस्तानकडून भारतात माहिती देणारे एजंट तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे, हेच यातून पुढे येते. त्यामुळे ‘हनी ट्रॅप’मध्ये कुणीही फसू शकतो. सहज उत्सुकता म्हणून विदेशी नागरिकांशी संवाद साधाल तरी फसाल. तुम्ही ‘हनी ट्रॅप’मध्ये फसाल, याची भनकही लागत नाही इतक्या सहजपणे माणूस जाळ्यात अडकतो. 

पोलिस आयुक्त : अनोळखी परदेशी व्यक्तीशी संपर्क टाळा 
दहशतवाद प्रतिबंधक विभागाने अटक केलेला आणि पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला दीपक शिरसाठ असाच लंडन येथील एका संवादात अडकला. त्यात त्याने २०१९ मध्ये संवेदनशील स्वरूपाची माहिती दिली. एखाद्या मुलीला विमानाविषयी एवढी माहिती असू शकते. या कुतूहलापोटी तो सहज फसत गेला. २०१९ मध्ये संवेदनशील माहिती दिली. कुणाशीही असा संवाद साधला जाऊ शकतो. त्यामुळे कुतुहूल म्हणूनही अनोळखी विदेशी व्यक्तीशी संवाद टाळा. लक्षात येणार नाही, इतक्या अलगदपणे लोक फसतात. नकळतपणे महत्त्वाची संवेदनशील माहिती देऊन बसतात, तशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी जागरूकपणे सोशल मीडियावर संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

तोफखान्यातील हेरगिरी 
तोफखाना केंद्राच्या छायाचित्राबाबत ‘हनी ट्रॅप’ नव्हता. विदेशी तरुणांच्या ग्रुपशी संवाद साधाण्याच्या उत्सुकतेपोटी संजीवकुमार (बिहारी मजूर) फसल्याचे पुढे आले आहे. दरवेळी ट्रॅप हा हनी असेलच असे नाही. तो कसाही असू शकतो. संजीवकुमार यानेही ९२३०३५३४२२८९ या पाकिस्तानी नागरिकांच्या सलमान व इब्राहिम नावाच्या व्हॉटसॲपग्रुपवर छायाचित्रे पाठविली. त्याची चौकशी सुरू असून, ३० ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या बँक खात्याची माहितीही घेण्यात आली असून, त्यात कुठलीही संशयास्पद माहीती पुढे आलेली नाही. देशाबाहेरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू नका. व्हॉटसॲप ग्रुपमध्ये अनोळखी विदेशींना थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT