patients treatment esakal
नाशिक

Nashik News: दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या काळजीसाठी SMBTमध्ये ‘पॅलिएटिव्ह केअर सेंटर’! शुक्रवारी उदघाटन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आजाराशी झगडण्याची दिशा आणि खंबीर पाठबळ देण्यासाठी एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयात ‘पॅलिएटिव्ह केअर सेंटर' सुरू करण्यात आले. ‘राहत’ असे या ‘पॅलिएटिव्ह केअर सेंटर’चे नाव आहे.

एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय व मुंबई येथील टाटा मेमोरियल रुग्णालयतर्फे ‘पॅलिएटिव्ह केअर सेंटर'चे येत्या शुक्रवारी (ता. १३) उदघाटन होईल. (Palliative Care Center in SMBT for the care of terminally ill patients Opening on Friday Nashik News)

कर्करोग, पक्षाघात, एचआयव्ही-एड्स, औषधाने न होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृद्धापकाळाने अपंगत्व आणि किडनी विकार, लिव्हर विकारग्रस्त दुर्धर आजाराचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत, त्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्‍थ्य बिघडते.

त्यात अनेक नातेवाईक खचून जातात. त्यातून सावरत रुग्णाची काळजी घेण्यासाठी केंद्रात मदत केली जाईल. केंद्रात डॉक्टरांसह परिचारिका, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णाच्या वेदना कमी केल्या जातील.

रुग्णाचे समुपदेशन केले जाईल. आजाराशी झगडण्यासाठी शारीरिक व मानसिक तयार केली जाईल. आहार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शनासाठी सेवा उपलब्ध असेल. डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. विनया वाघ यांच्यासह अनेक तज्ज्ञ पूर्णवेळ उपलब्ध असतील.

केंद्राच्या उदघाटनावेळी ‘पॅलिएटिव्ह केअर’ संकल्पना याविषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या वेळी डॉ. कुलकर्णी, टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या पॅलिएटिव्ह सल्लागार डॉ. जयिता देवधर, डॉ. रघू थोटा व डॉ. रूप गुरसहानी उपस्थित राहतील.

न्युरो पॅलिएटिव्ह केअर, एंड ऑफ लाइफ केअर, संभाषण कौशल्य व ठळक; परंतु वाईट बातमी अशा विषयावर मंथन होईल.

"दीर्घकालीन यकृत अथवा किडनी आजाराने ग्रस्त रुग्ण, कर्करोगाच्या उपचारांना प्रतिसाद न देणारे रुग्णांना डॉक्टर ‘पॅलिएटिव्ह केअर’चा सल्ला देतात. इथे रुग्णांना होणाऱ्या असह्य वेदनांवर वेदनाशामक अथवा उपशामक उपचार पद्धतीने दिलासा दिला जातो. एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयामध्ये ‘पॅलिएटिव्ह केअर युनिट’ उभारण्यात आले आहे. त्यात रुग्णांना दाखल केले जाईल."- डॉ. प्रदीप भाबड (वैद्यकीय अधीक्षक, एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT