Tax
Tax esakal
नाशिक

नाशिक : 5 वर्षांत प्रथमच पंचवटी विभागाची करवसुलीत आघाडी

सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ (जि. नाशिक) : महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाने घरपट्टी, नळपट्टी व जाहिरातकराच्या माध्यमातून ३१ मार्च २०२२ अखेर तब्बल ३५ कोटी ६२ लाख ७७ हजार ८९७ रुपये विक्रमी वसुली केली आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली झाल्याने पंचवटी विभागाने कर वसुलीत यंदा आघाडी घेतली आहे.

नाशिक महापालिकेच्या (NMC) पंचवटी विभागात १ लाख १३ हजार ५६ इतक्या एकूण मिळकती असून, ४२ हजार ५२६ नळ कनेक्शन आहेत. यापैकी अनेकांकडे घरपट्टी, नळपट्टीची थकबाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाने धडक वसुली मोहीम सुरू केली होती. ३१ मार्चच्या रात्री बारापर्यंतही मोहीम सुरू होती. यात घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे २३ कोटी ९५ लाख ७ हजार ४९४ रुपये, नळपट्टीच्या माध्यमातून १० कोटी ४२ लाख ७० हजार ४८३ रुपये तर ल जाहिरात व परवाने विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. असा एकूण ३५ कोटी ६२ लाख ७७ हजार ८९७ रुपये इतका विक्रमी महसूल जमा करण्यात आला. पाणीपट्टी व नळपट्टी जमा करण्यासाठी विविध उपक्रम राबवून वेळोवेळी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

पंचवटी परिसरातील विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना सोबत घेत महसूल वसुलीसाठी रॅली तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे देखील जनजागृती करण्यात आली होती. रिक्षाला भोंगे लावूनही थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले जात होते. महसूल वसुलीसाठी पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागवार निरीक्षक पुरुषोत्तम पवार, विलास देवरे, रवी मोरे, प्रकाश ढेपणे, उदय खैरनार, वसंत चव्हाण, अधीक्षक गंगाधर गायकवाड, रामदास तिदमे, लिपिक व शिपाई आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पहिल्यांदाच सव्वा कोटीहून अधिक वसुली

पंचवटी विभागीय कार्यालयातील मिळकत-जाहिरात व परवाने विभागाने गाळे-ओटे चालकांकडून इतिहासात प्रथमच मार्चअखेरला १ कोटी २५ लाखांवर करवसुल केला आहे. यासाठी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, सहायक अधीक्षक भूषण देशमुख, मंगेश वाघ, राजेश सोनवणे, दीपक मिंधे, प्रकाश उखाडे, राहुल बोटे, सचिन गवळी, संजय बोरसे आदींनी प्रयत्न केले.

जप्ती वॉरंटच्या ७८१ नोटिसा

घरपट्टी थकबाकीदारांमधील ७८१ जणांना जप्ती वॉरंटच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. १७४ नळपट्टी थकबाकीदारांचे नळकनेक्शन कट करण्यात आले आहे. कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी व नळपट्टी भरण्याचे आवाहन पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT