Panel chiefs are in confusion as the sarpanch reservation has been canceled nashik marathi news 
नाशिक

सरपंच कोण होणार? शाश्वती नसल्याने पॅनल प्रमुखांची हवा गुल; निवडणूक खर्चासाठी आखडता हात 

विजय पाटील

गिलाणे (जि.नाशिक) : मालेगाव तालुक्यातील ९९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावपुढारी, स्थानिक पुढारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र सरपंचपदाचे आरक्षण ऐनवेळी राज्य सरकारने रद्द केल्याने पॅनल प्रमुखांची हवा गुल झाली असून भावी सरपंच कोण याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

पॅनलप्रमुखांची मोर्चे बांधणी वाया

सरपंचपदाची आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी होणार, असे जाहीर झाले होते. त्यावेळी सर्व बिनधास्त होते. आपणच सरपंच होणार या आविर्भावात अनेकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. गावाचा कारभार आपल्या हातात येणार म्हणून काहींनी व्याजाने पैशांची जुळवाजुळव केली. आपल्या पॅनलमध्ये कोणते उमेदवार असावेत, कोण सरपंच असावा, कोण उपसरपंच असावा याचीही निश्चिती अनेकांनी करून ठेवली होती. कोणत्या वार्डात कोण निवडून येणार, उमेदवारांची मते किती, किती मते बाहेर गेलेली, वॉर्डात किती मते आपली, किती मते विरोधकांना पडतील विरोधकांचा प्रभाव किती या सर्वगोष्टींचा अभ्यास पॅनलप्रमुखांनी मागच्या दोन महिन्यांपासून केला. मात्र राज्य शासनाने सरपंचपदाची निवडणूक आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याचे जाहीर केल्याने पॅनल प्रमुख थंडगार पडले आहेत. 

खर्चाच्या बाबतीत आखडता हात

आता निवडणूक लढताना खर्च कोणी करायचा हा मोठा प्रश्न उमेदवाराला पडला आहे. आरक्षणामुळे पॅनल प्रमुख द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे पॅनल करतानाही अनेकजण आता डळमळताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार असणारे अनेक कार्यकर्ते हे सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिरमुसले असून पुन्हा तेच आरक्षण पडते की नव्याने दुसरे आरक्षण पडते या द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे खर्चावर ते आखडता घेत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. 

गावात गप्पा रंगू लागल्या 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गाव विकासावर गंध नसणारे ही सध्या गाव विकासाच्या गप्पा मारताना दिसू लागल्याने अनेक युवक सोशल मीडियावर टीका टिप्पणी करीत आहेत, अशा लोकांना जनता किती थारा देईल हे निवडणुकीच्या निकाला नंतरच कळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT