RTE.jpg 
नाशिक

''आरटीई प्रवेशप्रक्रिया नक्की कधी होणार?''...पालकांमध्ये वाढतेय संभ्रमावस्था!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) दरवर्षी शासनाच्या निर्देशानुसार लॉटरीप्रक्रिया पार पडून सुरू होणारी आरटीईची प्रवेशप्रक्रिया यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लांबली आहे. प्रक्रिया वेळेत सुरू होऊनही कोरोनाच्या अचानक कोसळलेल्या संकटामुळे प्रक्रियेचे नियोजन कोलमडले आहे. त्यातच पोर्टलवर पालकांनाही अद्याप कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने प्रवेशाविषयी अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया नक्की कधी होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पालकांना मुलांच्या आरटीई प्रवेशाची चिंता लागली आहे.

पालकांकडून पर्यायी शाळा शोधण्याच्या हालचाली 

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रभाव आढळल्याने प्रवेशप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. तसेच वाढत्या लॉकडाउनबरोबरच प्रवेशप्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना मात्र मुलांच्या प्रवेशाबाबतचा प्रश्‍न पडला आहे. प्रवेशाबाबत आरटीई पोर्टलवरही काही नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे पालकांकडून प्रवेशाबाबत सतत विचारणा होत आहे. आरटीईअंतर्गत सोयीची शाळा न मिळाल्यास पालकांना प्रवेशासाठी पर्यायी शाळांचा शोधही घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने पालकांकडून हालचालीही सुरू झालेल्या आहेत. 

आकडे बोलतात : (राज्य ) 

राज्यातील आरटीईपात्र शाळा : नऊ हजार 331 
प्रवेशासाठी एकूण जागा : एक लाख 15 हजार 446 
प्रवेशासाठी एकूण अर्ज : दोन लाख 91 हजार 370 
प्रवेशास पात्र विद्यार्थी : एक लाख 927 
प्रतीक्षा यादीत : 75 हजार 465 

नाशिक जिल्हा 

आरटीईपात्र शाळा : 447 
प्रवेशासाठी एकूण जागा : पाच हजार 557 
प्रवेशासाठी एकूण अर्ज : 17 हजार 370 
प्रवेशास पात्र विद्यार्थी : पाच हजार 307  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT