Dilapidated protective wall of Wavrenagar park. esakal
नाशिक

Nashik News : उद्यान नागरिकांसाठी की गावगुंड, मद्यपींसाठी; वावरेनगरातील रहिवाशांचा संतप्त सवाल

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील वावरेनगर उद्यानात रात्री मद्यपींचा धिंगाणा सुरू असून, दिवसा मात्र उद्यानाचा थेट प्रेमीयुगुलांनी ताबा घेतला असल्याचे वास्तववादी चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Park for citizens or alcoholics angry question of residents of Wavrenagar Nashik News)

सिडको वावरेनगरमध्ये असलेले वावरेनगर उद्यान समस्यांच्या गर्तेत अडकलेले असून, या उद्यानाचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुल आणि व्यावसायिकांसह काही राजकीय नेत्यांना त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे उद्यानाचा वापर नक्की लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी की मद्यपी, गावगुंडांसाठी, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उद्यानाच्या आवारात मद्यपींच्या धिंगाण्यामुळे परिसरातील महिला येथे येण्यास टाळाटाळ करत असतात. तर, ज्येष्ठ नागरिकदेखील येथे आल्यानंतर त्यांना असे प्रकार बघावयास मिळत असल्याने नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.

पोलिस प्रशासनाने सिडकोतील उद्यानाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, काही दिवसांपासून विविध ठिकाणी लावलेले स्कॅन कोड स्कॅनर होत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. पोलिसांकडून नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

"उद्यान परिसरात नेहमीच मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. अनेक गावगुंड उद्यानात येऊन रात्री व दुपारी सुमारास मद्यप्राशन करतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे सावट आहे."

- संगीता जाधव, गृहिणी

"उद्यानामध्ये मद्यपी व प्रेमीयुगुलांचा त्रास असून येथे येण्यास आम्ही टाळाटाळ करत असतो. या उद्यानावर प्रशासनाने जातीने लक्ष देऊन आमच्या समस्या त्वरित सोडवाव्यात."

- पुष्पा पाटील, गृहिणी

"स्थानिक पोलिस प्रशासनाने उद्यानाच्या परिसरात दुपारी व रात्री गस्त केल्यास त्यांना अनेक गावगुंड सापडू शकतील. त्यावर योग्य शासन केल्यास या उद्यानाचा परिसरातील रहिवाशांना वापर करता येईल."- जयश्री कोल्हे, गृहिणी

"उद्यानामध्ये थोडेच साहित्य असून, नेक रहिवासी येथील ग्रीन जिमचा वापर करत असतात. मात्र, उद्यानाची काही ठिकाणी दुरवस्था झालेली असून उद्यान विभागाने यावर त्वरित उपाययोजना करायला हवी. तर येथे रोज स्वच्छता होणे गरजेचे आहे."- मीनल शिंदे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT