School-Teacher esakal
नाशिक

नाशिक : महापालिका शिक्षकांचा दिल्‍ली अभ्यास दौऱ्यात सहभाग

शिक्षणाचा दर्जा, शाळांच्‍या सुविधांचा घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्‍यातील नगरपालिका व महापालिकांमध्ये(state government teachers) कार्यरत ८१ शिक्षकांचा नुकताच दिल्‍ली अभ्यासदौरा पार पडला. या दौऱ्यात नाशिक महापालिकेतील लीना जोशी, सविता पोतदार, ललिता बुऱ्हाडे यांनी सहभाग नोंदविला. दिल्‍लीतील शिक्षणाचा दर्जा, शाळांमध्ये उपलब्‍ध सुविधांचा आढावा त्‍यांनी या वेळी घेतला.महाराष्ट्र राज्‍य नगरपालिका व महापालिका शिक्षक संघटनेतर्फे राज्‍याध्यक्ष अर्जुन कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला. नाशिकहून(nashik) सहभागी झालेल्‍या शिक्षकांना नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्‍यान, दिल्‍ली दौऱ्यावेळी तेथील शाळांचे मॉडेल स्‍कूलमध्ये रूपांतर होताना राबविल्‍या जात असलेल्‍या विविध गोष्टींविषयी मार्गदर्शन व शिक्षकांसोबत संवाद साधला. सरकारी शाळांतील पायाभूत सुविधा, गुणवत्ता, शिक्षकांची प्रशिक्षण व प्रोत्‍साहन पालकांची सहभागी उपक्रमशीलता आदी वैशिष्ट्ये अनुभवायला मिळाली. दिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे स्‍वीय सहाय्यक डॉ. बिपिन पांडे यांनी शिक्षकांना दिल्‍लीतील शाळांच्‍या परिवर्तनाचा प्रवासाविषयी मार्गदर्शन केले. नानकपुरा परीसरातील सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य मनोज पांडे यांनीही मार्गदर्शन केले. नील लोहिया या शिक्षकांनी सादरीकरणाद्वारे उपक्रमांची माहिती दिली. सहभागी शिक्षकांना दोन तासांचे विशेष प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT