crime news fraud  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: मासेमारीसाठी ‘पार्टनर’नेच घातला 20 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : कश्‍यपी धरणात मासेमारी करण्यासाठी ठेक्यात भागीदार पत्र करताना एकाने दोघांना डावलून स्वतःच्याच नावे ठेका घेत, २० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी इम्रान हनीफ शेख (३५, रा. गणेशनगर, वडाळा गाव) यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Partner cheated 20 lakhs for fishing Nashik Fraud Crime )

धरणांवर मासेमारी करण्यासाठी मत्सव्यवसाय विभागाकडून दरवर्षी कंत्राट दिले जाते. २०२१ मध्ये कश्यपी धरणावर मासेमारीचे कंत्राट कश्यपी संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेकडून मासेमारीचे काम घेण्याचे शेख आणि संसरी गावात जानकी निवास येथे राहणारे स्वप्नील भारद्वाज पगारे (३२) यांनी ठरविले.

दोघांमध्ये भागीदारीत सुरू करण्यात येणाऱ्या या व्यवसायासाठी संबंधित संस्थेशी भागीदार पत्र करणे गरजेचे होते. याकामी शेख याने पगारे तसेच या व्यवहारात साक्षीदार असलेले कृष्णा भाऊसाहेब थेटे यांच्याकडून २० लाख १५ हजार रुपये घेतले.

त्यानंतर शेख याने भागीदार पत्र मात्र पगारे आणि थेटे यांना डावलून स्वतःच्या नावे केले. ३१ ऑगस्ट २०२१ ते ३० जुलै २०२२ यादरम्यान ही घटना घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारे यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेऊन शेख यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव करीत आहेत. दरम्यान, फसवणूक झालेले पगारे यांचे वडील मत्सव्यवसाय विभागात कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत.

ज्या संस्थेला मत्सव्यवसायाचे कंत्राट देण्यात येते, त्या संस्थेत अन्य कोणी भागीदार होत असेल तर त्याचे रीतसर भागीदार पत्र मत्सव्यवसाय विभागात सादर करणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक झाल्यास संबंधिताला या ठिकाणी दाद मागता येते.

पण पगारे यांच्या प्रकरणात भागीदारीबद्दल मत्सव्यवसाय विभागाला कोणतीही माहिती नसल्याने या विभागानेही यात फारसे लक्ष घातलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT