Depressed-man.jpg 
नाशिक

कोरोनाच्या भितीने पत्नीला पाठवले माहेरी...स्वत:ला कोेडले घरात! अन् मग...

सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : कोरोना... कोरोनाचा सातत्याने होणारा भडिमार, मनात आजाराच्या बसलेल्या दहशतीने रुग्णाने आजाराच्या भीतीने पत्नीला आठ दिवसांपासून माहेरी पाठवून देत स्वत:ला घरात कोंडून घेतले. सर्वेक्षणासाठी घरोघरी फिरणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर या व्यक्तीस रुग्णवाहिका बोलावून पथकाने रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडली ती श्रमिकनगरातील सातमाउली परिसरात...

अशी घडली घटना...
देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णांच्या संख्येपेक्षा आजाराविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवा व जनजागृतीच्या अभावामुळे समाजातील विविध घटकांत भीती निर्माण झाली आहे. त्यात नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणारी सर्व समाजातील मित्रमंडळी, शेजाऱ्यांमध्ये एकमेकांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच गंभीर परिणाम या घटनेतून बघावयास मिळाला तो नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगर भागातील सातमाउली परिसरात बुद्धविहारासमोर राहत असलेल्या एका मंडपवाल्याबाबतीत. ही व्यक्ती अनेक दिवसांपासून आजारी होती. ही बाब त्याने कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकीयांपासून लपविली. त्यातच त्याने पत्नीलाही माहेरी पाठवून दिले. घरात स्वत:ला बंदिस्त करून घेतले. आठ दिवसांनंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली. शेजारी व नातेवाइकांनी त्याला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. पण त्याने कोरोनाच्या भीतीने दवाखान्यात न जाता घरातच स्वतःला कोंडून घेतले.

पत्नी आठ दिवसांपासून माहेरी; सर्वेक्षणात उघडकीस आली घटना 

महापालिकेचे वैद्यकीय पथक सर्वेक्षणानिमित्त घरी आले. पण या पथकालाही तपासणी करण्यास नकार दिला. शेवटी सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडेंसह पथकाला वैद्यकीय पथकाने बोलावून घेतले. पोलिसांनी त्याची समजूत काढत त्याला रुग्णवाहिकेत बसवत उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. या घटनेची वार्ता समजताच व रुणवाहिका परिसरात आल्याचे पाहून परिसरवासीयांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शेवटी पोलिसांनी आपला खाकीचा धाक दाखविताच सर्व माघारी गेले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT