crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बोगस त्वचारोग तज्ञाचं फुटलं बिंग; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

नाकावर आलेले डागावर उपचारासाठी गेलेल्या युवकावर बोगस त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जनने पात्रता नसतानाही उपचार केले.

सकाळ वृतसेवा

Nashik Crime News : नाकावर आलेले डागावर उपचारासाठी गेलेल्या युवकावर बोगस त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जनने पात्रता नसतानाही उपचार केले. यामुळे रुग्णाच्या नाकास डॉक्टर दाम्पत्याने गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात डॉ. जयदीप घोषाल व डॉ. सुजाता घोषाल यांच्याविराेधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (patient nose severely injured by doctor couple fake Dermatology plastic surgery degree fraud crime case filed nashik)

शुभम गुजर (रा. अयोध्या नगरी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ते मे २०२० मध्ये नाकावरील डाग काढण्यासाठी कॅनडा कॉर्नर येथील स्किनेरेला ॲस्थेटीक स्कीन, हेअर अँड लेझर क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेले होते.

क्लिनिक डॉ. सुजाता घोषाल यांच्या नावे असताना संशयित डॉ. जयदीप घोषाल याने स्वत: कुशल व अनुभवी डॉक्टर असल्याचे गुजर यांना खोटे सांगितले. त्यामुळे गुजर यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवत उपचार सुरु केले.

मात्र उपचारानंतर नाकावरील व्रण जाण्याऐवजी ते वाढले व नाकास गंभीर दुखापत झाली. यात डॉ. जयदीपने भुलीविना वेदनादायक उपचार केले. त्यामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.

याबाबत त्यांनी चौकशी केल्यानंतर सदरील डॉ. घोषाल यांच्याकडे केवळ एमबीबीएस डॉक्टरची पदवी असून त्यांनी त्वचारोग वा प्लास्टिक सर्जरीची कोणतीही डिग्री नसताना गुजर यांच्यावर उपचार केल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी गुजर यांनी आरोग्य विभाग आणि महापालिकेकडे वारंवार तक्रार केल्यानंतर चौकशीअंती सरकार वाडा पोलीस ठाण्यात डॉ. घोषाल दांपत्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीसाठी पाठपुरावा

संबंधित त्वचारोग तज्ञ भासविणाऱ्या डॉक्टरांचे बिंग फोडण्यासाठी गुजर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या चौकशीतून संबंधित डॉक्टर हे तज्ञ नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरूनच गुजर यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या डॉक्टर विरोधात यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते.

"डॉक्टरांकडे रुग्ण विश्वास ठेवून जात असतात परंतु काही बोगस डॉक्टर चुकीचे उपचार केल्याने रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या प्रकरणातून लोकांची जनजागृती व्हावी एवढीच मर्यादित अपेक्षा आहे."- शुभम गुजर पीडित रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT