Payment of educational materials through DBT by government nashik news  
नाशिक

Nashik News: शैक्षणिक साहित्याचे पैसे डीबीटीद्वारे; शासनाचा आदिवासी विकास विभागाला दणका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: आदिवासी विकास विभागाने आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे रक्कम देण्याचे रद्द करीत शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला होता. वर्ष संपत आलेले असताना स्टेशनरी खरेदीची निविदा प्रक्रियाच सुरू असल्याने शाळा संपल्यावर शैक्षणिक साहित्य मिळण्याची शक्यता होती.

त्यामुळे शासनाने आता शैक्षणिक साहित्य कीट खरेदीची ३८ कोटींची निविदा रद्द करीत विभागाला दणका दिला आहे. साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे दिले जाणार आहेत. (Payment of educational materials through DBT by government nashik news )

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळांमधून जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासह वसतिगृहांमध्ये निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, नाईट ड्रेस पुरविले जातात. पूर्वी हे साहित्य विभागाकडून खरेदी करून त्यांचे वाटप होते.

शिंदे- फडणवीस- पवार सरकारने ३१ जुलैला ‘डीबीटी’ योजनेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री वगळण्याचा निर्णय घेत शासन आदेश काढला. सरकारने या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक वर्गनिहाय खर्च निश्चित केला असून, यावर्षी ठरविल्यानुसार विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे प्रत्येकी चार हजार रुपये दिले जातील. उर्वरित रक्कम साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार आहे.

तर वर्ष संपवून गेले असते...

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य पुरविण्यासाठी एकाच वेळी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी मिळून १५० कोटींची खरेदी होणार होती. त्यातील ३७.७९ कोटी रुपयांच्या निधीतून शैक्षणिक साहित्य कीट खरेदीचे टेंडर आदिवासी विकास विभागाने प्रसिद्ध केली.

त्याबाबत ४ डिसेंबरला निविदेत सहभागी झालेल्या पुरवठादारांची प्रिबिड बैठकही झाली होती. विभागाने १२ डिसेंबरला साहित्य खरेदीऐवजी ती रक्कम थेट बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

या शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले असून, या निविदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूंचा पुरवठा करेपर्यंत शैक्षणिक वर्ष संपून जाईल. यामुळे या वर्षापुरती शैक्षणिक साहित्यासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT