Greenfield Highway esakal
नाशिक

Greenfield Highway: समृद्धीप्रमाणे अधिकचा मोबदला मिळावा; शेतकऱ्यांची आमदार बनकर यांच्याकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

Greenfield Highway : निफाड तालुक्यातील शेतीही बागायती असून, शासनाच्या बाजारमूल्यापेक्षा अधिक दराने येथील शेतजमिनीची खरेदी-विक्री होते.

त्यामुळे सुरत-नाशिक-नगर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शासकीय मूल्यापेक्षा अधिक दराने म्हणजे समृद्धी महामार्गाप्रमाणे भूसंपादनाचा बाजारभाव मिळावा, तसेच प्रकल्पबाधित असा शासकीय दाखला मिळावा, अशी मागणी गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार बनकर यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे भूसंपादनाच्या मोबदला बाजारभावापेक्षा अधिक मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत सुचविले आहे. (Pays More like samruddhi highway Demand of farmers to MLA Bankar about Greenfield Highway nashik)

सुरत-नाशिक-नगर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

त्यात निफाडच्या गोदाकाठ परिसरातील चेहडी खुर्द, वर्हेदारणा, लालपाडी, दारणा सांगवी, सावळी, चाटोरी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाडे गावातील भूसंपादन प्रस्तावित आहे, पण त्यासाठी शासकीय मूल्याप्रमाणे मोबदला देणार असल्याचे समजल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रकल्पबाधित होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा प्रचलीत दरापेक्षा निम्माच आहे. त्या तुलनेत सुमद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचा दर वाढीव होता. त्या पातळीवर दर मिळावा यांसह प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आमदार बनकर यांनी त्यावर तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र शासनाकडे प्रस्तावित करण्याचे कळविण्यात आले आहे.

निवेदनावर शिवाजी सानप, ज्ञानेश्‍वर खाडे, फिरोज शेख, शिवाजी सानप, कांतिलाल बोडके, रोशन शिंदे, सोमनाथ वडघुले, सोमनाथ सानप, काशिनाथ टर्ले, मधुकर खाडे, शशिकांत सानप, संदीप सानप, रामदास फड, हरीश शिंदे, गोविंद शिंदे, नामदेव रूमणे, रामा फड, परवेझ शेख, धनंजय शिंदे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

"ग्रीनफिल्ड महामार्गात भूसंपादनाचा दर आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. शासकीय मूल्याचा निकष न लावता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर दर द्यावा, अन्यथा शेतकरी या प्रकल्पाला विरोध करतील." -शिवाजी सानप, शेतकरी, वर्हेदारणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT