MHT CET exam latest marathi news esakal
नाशिक

‘PCM’ चे प्रवेशपत्र झाले उपलब्‍ध MHT-CET परीक्षेचे 5 ऑगस्‍टपासून आयोजन

अरूण मलाणी

नाशिक : अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्मसी) यांसह बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षेला ५ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे.

या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२६) प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) उपलब्‍ध करून दिलेले आहेत. (PCM Admit Card Available MHT CET Exam Conducted From 5th August nashik latest marathi news)

विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांच्‍या संदर्भात सीईटी सेलतर्फे सूचना जारी केलेल्‍या आहेत. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्‍यकता असणार आहे. टप्‍याटप्‍याने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाते आहेत.

एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

यापैकी पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते ११ ऑगस्‍ट या कालावधीत घेतली जाईल. १२ ते २० ऑगस्‍ट या कालावधीत होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेसाठी २ ऑगस्‍टपासून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत.

परीक्षेची तारीख, वेळ प्रवेशपत्रावर

एमएचटी-सीईटी ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असून, सत्र पद्धतीने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेची तारीख, वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) यावर नमूद केलेला आहे. ही माहिती काळजीपूर्वक वाचून परीक्षेच्‍या एक दिवस आधी संबंधित परीक्षा केंद्राला भेट देण्याच्‍या सूचना सीईटी सेलने दिलेल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT