landore.jpg
landore.jpg 
नाशिक

VIDEO :ह्रदयद्रावक! साथीदाराचा विरह सहन होईना; मोराच्या विरहात लांडोरचा आकांत..प्रेमकथा वाचाच!

माणिक देसाई

नाशिक / निफाड : आपल्या अपघातग्रस्त जोडीदाराच्या विरहाचा आकांत हा ज्याच्या त्याच्या करिता आयुष्यातील वाईट क्षण असतो. माणसाप्रमाणे प्राण्यांमध्ये देखील प्रेमाचे नाते असते. कारण असाच काहीसा प्रकार निफाड तालुक्यात घडला आहे. येथे मोराच्या विरहात लांडोरीचा अकांत सुरू आहे. एका मोराची व्यथा व लांडोरीची प्रेमकथा ऐकून नक्कीच सर्व जण हळहळ व्यक्त करतील.

जोडीदाराचा विरह सहन होईना!

निफाड-सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले सावळी (ता. निफाड) गाव आहे. या गावात मोठ्या संख्येने मोरांचा मुक्त संचार असतो. २७ जुलैला सायखेडा-सिन्नर रस्त्यालगत एका शेतात मोर उडत असताना त्याचा पाय झाडाच्या फांद्यात अडकला. या वेळी यातून स्वत:ची सुटका करत असताना मोराचा पाय मांडीमध्ये मोडला गेला. त्यामुळे तो जागेवरच कोसळला. या वेळी मोराबरोबर लांडोरीदेखील होती. ती मोराच्या अवतीभवती फिरून मोराला उडण्याचे बळ देत होती. मोराला उडणे शक्य होत नव्हते. पुढे..

पक्षीमित्राने पाहिला प्रकार

हा सर्व प्रकार रस्त्याने जात असलेले संजीव गिरी या पक्षीमित्राने पाहिला. त्यांनी तत्काळ जखमी मोराला घरी आणून अन्न, पाणी दिले. वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर वन विभागाने जखमी मोराला उपचाराकरिता नाशिकला आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोराच्या पायाची तपासणी करत मोडलेल्या पायाला प्लॅस्टर करत निफाड येथील वन विभागाच्या ताब्यात दिले.
आता मोराची प्रकृती सुधारत आहे. हा मोर लवरकच बरा झाल्यानंतर त्याला अधिवासात सोडून देण्यात येणार आहे.

लांडोर व्याकूळ
दरम्यान, गेली पंधरा दिवसांपासून आपल्या जोडीदाराच्या विरहाने व्याकूळ झालेली लांडोर सध्या संजीव गिरी यांच्या घराजवळच बस्तान मांडून बसली आहे. दररोज लांडोर मोराला ज्या घरामध्ये ठेवले होते त्या घरात जाऊन आपला जोडीदार आला आहे का हे पाहत आहे. मात्र मोर दिसत नसल्याने त्याच्या आठवणीने जोरात आवाज काढून आपल्या भावना प्रकट करत आहे.

प्रेमात व्याकूळ लांडोर घरावर, अंगणात आवाज देतेय 

"मोर जखमी अवस्थेत असताना संजीव गिरी यांनी मोरावर अन्नपाणी देत घरगुती औषधोपचार केले. यासाठी त्यांनी रात्रभर जखमी मोर घरात ठेवला होता. या मोराच्या पाठीमागे लांडोर आली आहे. मोराला शोधण्यासाठी त्याच्या प्रेमात व्याकूळ लांडोर घरावर, अंगणात आवाज देत फेटका मारत आहे. सध्या त्याच्यावर निफाड येथे उपचार सुरू आहेत. तो बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडले जाणार आहे".-संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

"उपचारानंतर जखमी मोराच्या प्रकृतीची काळजी निफाड येथील रोपवाटिकेत वनकर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली घेतली जात आहे. लवकरच मोर बरा झाल्याननंतर लांडोरीसोबत अधिवासात एकत्र सोडले जाईल. तोपर्यंत मोराच्या प्रेमात व्याकूळ असलेल्या लांडोरीला काही दिवस मोराला बरे होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे."-संजीव गिरी, बेरवाडी

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT