cet form.jpeg 
नाशिक

शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जासाठी मुदतवाढ!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शिक्षणशास्त्र शाखेतील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. लॉकडाउनमुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार आता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना 8 मेपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करता येणार आहे. 

अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अर्जाची मुदतवाढ

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या संदर्भात सूचना जारी केली आहे. यापूर्वी दिलेल्या मुदतवाढीनुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अर्जाची मुदतवाढ दिलेली होती. बहुतांश विद्यार्थी सायबर कॅफे किंवा अन्य माध्यमातून अर्ज करत असतात. सध्याच्या "लॉकडाउन'च्या परिस्थितीमुळे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता, ही मुदतवाढ दिली जात आहे. बी.पी.एड., बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड कोर्स, एम.पी.एड., बी.ए./बी.एस्सी.बी.एड इंटिग्रेटेड कोर्स, एम.एड. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीकरिता आता विद्यार्थ्यांना 8 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. 

सीईटी परीक्षेच्या तारखेत होणार बदल 

दरम्यान, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा मे महिन्यात होणार होती. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार बी.पी.एड.करिता 11 मे, बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड कोर्सकरिता 12 मे, एम.पी.एड.करिता 14 मे, बी.ए./बी.एस्सी बी.एड. इंटिग्रेटेड कोर्सकरिता 20 मे, एम.एड. या अभ्यासक्रमाची सीईटी 26 मेस होणार होती; परंतु आता अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली असल्याने परीक्षांच्या तारखांमध्येही बदल होण्याची शक्‍यता आहे. या तारखांसंदर्भातील सूचना 7 मेपर्यंत स्वतंत्ररीत्या जारी केली जाणार असल्याचेही सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदेंनी पत्नीसह केली गणरायाची आरती; घरच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT