Nashik News : प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आणि आवश्यक प्रशिक्षणासह किमान १२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना २० वर्षांपासून प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली आहे.
यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाकडे या निवड श्रेणीसाठी दोन हजार ४३० प्रस्ताव प्राप्त झाले होते. (Pending senior pay scale sanctioned to 2341 teachers in district nashik news)
विभागामार्फत शिबिर घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पात्रता तपासणी केली. त्यातून ददोन हजार ३४१ पात्र अर्जांना मंजुरी दिल्याने त्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणीचा प्रलंबित लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत.
एकाच वेतनश्रेणीत व एकाच पदावर सलग १२ वर्षे सेवा कार्यरत शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यासाठी सेवा कालावधीत आवश्यक असणारे प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. ही वेतनश्रेणी लागू होणाऱ्या शिक्षकांना वेतनातही लाभ होतो. शासन निर्णयातील आक्षेपार्ह अटी रद्द करून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१९ मध्ये याबाबत नवीन शासन निर्णय काढला होता.
त्यामुळे दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागू शकला आहे. शासन निर्णयानुसार प्रारंभीच्या १२ वर्षांच्या निवड श्रेणीचा लाभ सर्वांनाच मिळतो, मात्र त्यानंतरच्या पुढील १२ वर्षांच्या टप्प्याचा लाभ मिळण्यातच अनेक अडचणी होत्या. शासन निर्णयानुसार हा दुसऱ्या टप्प्यातील निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठीची प्रक्रिया दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू होती.
त्यासाठी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेबाहेर आंदोलने झाली होती. ज्या शिक्षकांचा दुसरा १२ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे, त्या शिक्षकांनी जेव्हापासून हा टप्पा पूर्ण केला आहे. तेव्हापासून त्यांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे १२ वर्षांचा टप्पा जितक्या वर्षांपूर्वी पूर्ण झाला आहे. तेव्हापासून प्रलंबित वेतन त्यांना मिळू शकणार आहे. त्यामुळे शिक्षकांना लाखांच्या पटीत लाभ होऊ शकणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.