death
death  esakal
नाशिक

Nashik News : अंगावर दगड पडल्याने यात्रेकरुचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आज दुपारी 2.30 च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरुच्या अंगावर ब्रम्हगिरी येथील दरड कोसळल्याने जागीच मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (person died due to stone falling on his body nashik news)

भानुदास अश्रू आरडे (वय ५२) रा.निमगाव ता.माजलगाव जि.बीड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी मयत व्यक्तीच्या अंगावर तीन ते चार दगड पडले होते. तसेच हातपाय आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती तात्काळ त्र्यंबक पोलिसांना कळाली असता त्यांनी घटना स्थळी धाव घेत ब्रह्मगिरीवरुन डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार लगत आणले. त्यानंतर गंगाद्वारवरुन त्र्यंबकराजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेतुन मृतदेह खाली शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखलकरेपर्यंत सायंकाळचे सात वाजले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डाॅ.प्रशांत पाटील यांनी जखमी रुग्णास तपासले असता जखमी इसम जागेवरच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून आरडे यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदना साठी नाशिक येथे पाठविण्यात आले. त्र्यंबक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतचा अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गंगावणे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT