Pesa Sarpanch Council to agitate against the government 
नाशिक

PESA Act Recruitment: "...तर सरकारला विद्यार्थ्यांच्या 'नक्षलवादाला' सामोरं जावं लागेल!" आदिवासी विद्यार्थ्यांचा इशारा

नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी विद्यार्थ्यांच बेमुदत उपोषण आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : राज्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या नक्षलवादाला सरकारला सामोरं जावं लागेल, असा गंभीर इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पेसा पदभरती संदर्भात विद्यार्थ्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे. गडचिरोलीतील पात्रधारक आदिवासी विद्यार्थ्यी याप्रकरणी आक्रमक झाले आहेत. यावर आमदार सुनील भुसारा यांनी देखील भाष्य केलं आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यानुसार, राज्य सरकारनं आदिवासी १७ संवर्गातील पेसा पदभरती तात्काळ आणि कायमस्वरूपी न केल्यास विद्यार्थ्यांच्या नक्षलवादाला सामोरं जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी राज्यभरातून नाशिकमध्ये आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. नाशिकच्या ईदगाह मैदानावर आदिवासी विद्यार्थ्यांच बेमुदत उपोषण आहे.

मागील वर्षभरापासून आदिवासी १७ संवर्गातील पात्रताधारक विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून सामान्य प्रशासन विभागानं पदभरती थांबवल्याचा पात्रताधारक विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं तात्काळ बैठक घेवून पात्रताधारक आदिवासी विद्यार्थ्यांना तात्काळ कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी आमदार सुनील भुसारा यांनी केली. सरकारनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी केला जाणारा खेळ थांबवावा, असंही सुनील भुसारा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT