pf esakal
नाशिक

नाशिक : PF स्लीप आता थेट कर्मचाऱ्यांच्या खिशात!

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

दाभाडी (जि.नाशिक) : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील १३ हजार २०० कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीच्या (provident fund) वेतन चिठ्ठ्या आता ॲपद्वारे उपलब्ध होणार आहेत. वेतन चिठ्ठ्यांसाठी जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने निःशुल्क ॲपची (free app) निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग राबविण्यात येत आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी (independence day) हे ॲप कार्यान्वित होत आहे. खातेदारांना स्वतःच्या वेतन चिठ्ठ्या आता ऑनलाइन पद्धतीने थेट खिशात उपलब्ध होणार असल्याने या अभिनव प्रयोगाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

राज्यातला पहिलाच प्रयोग; ‘नाशिक पीएफ’ ॲपचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

भविष्यनिर्वाह निधीच्या वेतन चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांना विनाअडथळा उपलब्ध व्हाव्यात, ही मागणी सर्वश्रुत आहे. सर्वोत्तम पर्याय शोधताना ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगाच्या सादरीकरण समारंभात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नरेंद्र दराडे, उपसंचालक नितीन उपासनी यांनी वेतन पथक कार्यालय व तंत्रस्नेही शिक्षकांचे कौतुक केले. राज्यभरातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सादर करण्याचे संकेत आमदार डॉ. तांबे व आमदार दराडे यांनी या वेळी दिले. नाशिक वेतन पथकाचे अधीक्षक उदय देवरे, सहाय्यक लेखाधिकारी आर. व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील येथील तंत्रस्नेही शिक्षक शेखर ठाकूर व संदीप ठोके, सॉफ्टवेअर अभियंता स्वप्नील वानखेडे यांनी या ॲपची निर्मिती केली आहे. वेतन पथक कार्यालयात खातेदारांच्या अधिकृत नोंदणीपात्र मोबाईल क्रमांकावरून खातेदारांना वेतन चिठ्ठ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या शाळांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती अंतिम पडताळणी पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध होईल. खातेदारांचे अभिलेख पूर्तता करण्यासाठी वेतन पथकाकडून विशेष शाळानिहाय शिबिर घेण्यात येत आहे.

भविष्यनिर्वाह निधीच्या कपातीच्या पावत्या आणि अद्ययावत हिशेब याविषयी वेतन पथक आणि शिक्षक संघटना यांच्यातील द्वंद्व नेहमीच समोर येत होते. पीएफ स्लीपबाबतचा प्रश्‍न कायमचा निकाली काढताना तंत्रज्ञानाचा चपखल वापर करत पीएफ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

लाभक्षेत्र : नाशिक जिल्हा

लाभार्थी शाळांची संख्या : ९९०

पीएफ खातेदार कर्मचारी : ९०००

डीसीपीएस खातेदार कर्मचारी : ४२००

जिल्ह्यातील भविष्यनिर्वाह निधी खातेदारांना सहजरीत्या निःशुल्क वेतन चिठ्ठ्या उपलब्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यश आले आहे. -उदय देवरे, अधीक्षक, वेतन पथक, नाशिक

सुलभ पद्धतीने वेतन चिठ्ठ्या मिळाव्यात, अशी अपेक्षा खातेदारांची होती. त्यानुरूप ॲप बनविण्यात आले आहे. जिल्ह्यात त्यावर पसंतीची मोहोर मिळेल. - शेखर ठाकूर, तंत्रस्नेही शिक्षक, के. जे. एन. विद्यालय, दाभाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT