सकाळ वृत्तसेवा
नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. या आजाराचे निदान करण्यासाठीची चाचणी शासकीय यंत्रणेमार्फत केली जात आहे. परंतु मोफत चाचणी करून देण्याचा दावा करणारे काही ई-मेल देशातील हजारो ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत. पण या मेलबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
मोफत कोरोना टेस्टच्या बहाण्याने 'असाही' घातला जातोय गंडा.
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. या आजाराचे निदान करण्यासाठीची चाचणी शासकीय यंत्रणेमार्फत केली जात आहे. परंतु मोफत चाचणी करून देण्याचा दावा करणारे काही ई-मेल देशातील हजारो ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत. या ई-मेलवरील लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्सकडून मोबाईलमधील गोपनीय माहितीवर डल्ला मारला जात असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे संशयास्पद वाटणाऱ्या कुठल्याही ई-मेलच्या लिंकला क्लिक करू नये व असे ई-मेल डिलीट करून टाकावेत, असा सल्ला दिला आहे. दरम्यान, या संभाव्य धोक्याची सूचना बॅंकांमार्फत आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवली जात आहे. ई-मेल, मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयीकृत बॅंका ग्राहकांना सतर्क करत आहेत.
INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..
शासकीय ई-मेल असल्याचा केला जातोय फसवा दावा
फसवणुकीसाठी पाठविल्या जाणारे ई-मेल चक्क शासकीय असल्याचे भासविले जात आहे. संबंधितांना विश्वास बसावा, यासाठी ई-मेलचा शेवट .gov असा केला जात आहे. तसेच ई-मेलमध्ये अन्य तपशिलाची विचारणा करताना संवेदनशील माहिती गोळा केली जात असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय म्हणतात सायबरतज्ज्ञ
कोरोनाबाबतच्या भीतीची फायदा उचलत फसवे ई-मेल केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. अशा फसव्या ई-मेलवरील लिंकवर कुणीही क्लिक करू नये. नियमितपणे पासवर्ड बदलत राहावे. संशयित ई-मेल तातडीने डिलिट करावे. -अमर ठाकरे, सायबरतज्ज्ञ
बॅंकांकडून ग्राहकांना सावध
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वांच्याच मनात भीतीने घर केले आहे. याच भीतीचा फायदा उचलताना मोफत कोरोना टेस्टची बतावणी करणाऱ्या ई-मेलद्वारे आर्थिक फसवणुकीची शक्यता वर्तविली आहे. यासंदर्भात बॅंकांकडून ग्राहकांना सावध केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.