Tax Due
Tax Due esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा पाणी, घरपट्टीचा 5 कोटींचा कर थकला!

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे करवसुलीत दमछाक होणाऱ्या पिंपळगाव ग्रामपंचायतीपुढे यंदाचे वर्षही पाणी व घरपट्टी वसुलीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. आर्थिक वर्ष संपण्याला अवघे दोन महिने शिल्लक असताना ५० टक्केसुद्धा करवसुली झालेली नाही.

साडेसात कोटी रुपयांपैकी अवघे अडीच कोटी म्हणजे ३३ टक्के करवसूल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे यात शहरातील बड्या आसामीसह संस्थाचा समावेश कर थकविणाऱ्यांमध्ये आहे. थकीत करवसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासन कारवाईचा कोणता गिअर टाकते, याबाबत उत्सुकता आहे. (Pimpalgaon Gram Panchayat water house tax of 5 crore overdue Nashik News)

पिंपळगाव ग्रामपंचायतीला पाणी व घरपट्टी हे उत्पन्नाची मुख्य स्त्रोत आहेत. दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्वाचे आर्थिक बजेट कोलमडले. व्यवसाय मंदावले तर कुणाचे रोजगार गेले. त्याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर झाला. सलग तिसऱ्या वर्षीही करवसुलीअभावी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे.

रोजचा खर्चाचा मेळ घालण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, विकासकामावर मोठा परिणाम झाला. करवसुलीसाठी दर वर्षीप्रमाणे ग्रामपंचायतीने सप्टेंबरमध्ये घरपट्टी भरल्यास पाच टक्के डिस्काउंटचा फंडा राबविला होता. त्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली.

करवसुलीसाठी डिसेंबरमध्येच संबंधित नागरिकांना ग्रामपंचायतीकडून कर भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या. तरीही कर वसुली होऊ शकली नाही. तब्बल पाच कोटींच्या थकबाकी वसुलीचे आव्हान आहे.

आर्थिक वर्षपूर्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना हे दिव्य पिंपळगाव ग्रामपंचायतीचे प्रशासन कसे पार करणार, याकडे लक्ष आहे. थकबाकीदारांमध्ये बडे व्यावसायिक, संस्थांचा समावेश आहे.

तर काही मिळकतधारक राजकीय छत्रछायेखाली असल्याचे यादीवर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते. चार हजार ९७० एवढे पाणीपट्टीचे खातेदार आहेत, तर १४ हजार ३०० घरपट्टी धारकांची संख्या आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

कारवाईचा गिअर टाकणार का

बहुतांश भागात मुबलक पाणीपुरवठा करून पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासन शहरातील नागरिकांना उन्हाळ्यातही ओलेचिंब करते. निधीचा अभाव असतांनाही विकासाची आश्‍वासक कामे साकारली आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन दायित्व निभावत असताना नागरिक मात्र कर भरत नाहीत. तब्बल ६७ टक्के कर थकला आहे. करथकीत असलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडणे, व्यावसायिकांच्या दुकानांना सील लावणे, अशी कारवाई होण्याची शक्यता आहे.

पण नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक व काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने कारवाईला राजकीय आडकाठी येण्याची शक्यता आहे.

"कर भरण्यासाठी नागरिकांनी स्वयस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे; अन्यथा कटू कारवाईचा प्रसंग ओढवू शकतो. करवसुलीअभावी विकासकामांबरोबरच प्रशासनाच्या दैनदिन कामकाजावर परिणाम होत आहे."-भास्करराव बनकर, (सरपंच, पिंपळगांव बसवंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT