Pimpalgaon Market Committee esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगाव बाजार समिती उत्पन्नात उत्तर महाराष्ट्रात प्रथम!

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महाराष्ट्र राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या असून २९५ बाजार समितींच्या उत्पन्नात मार्यादीत कार्यक्षेत असलेल्या बाजार समित्यांमध्ये उत्तर महाराष्र्टात प्रथम आली आहे.

लासलगाव बाजार समिती दुसऱ्या क्रमांकावर आहे. आमदार दिलीपराव बनकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे याबाबत मागितलेल्या माहितीवरून ही स्थिती पुढे आली आहे. (Pimpalgaon Market Committee first in North Maharashtra in income Nashik News)

श्री. बनकर यांनी राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांची २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मिळालेल्या उत्पन्नाबाबतची माहिती मागविली होती. त्यांना २९५ बाजार समित्यांची उत्पन्नाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

त्यानुसार राज्यातील प्रादेशिक बाजार समितीत रु.१०१,५८,२०,८२७ उत्पन्न मिळवित मुंबई पहिल्या क्रमांकावर, ७६,१०,३२,९४३ उत्पन्न मिळवीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर तर ३०,३०,१४,७०४ उत्पन्न मिळवीत नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये २५,२०,४१,७१७ उत्पन्न मिळवीत सोलापूर पहिल्या, २४,२०,८४,२९६ उत्पन्न मिळवीत लातूर दुसऱ्या तर २१,९६,८७,२४८ उत्पन्न मिळवीत पिंपळगाव बसवंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर १९,३५,३७,४९४ उत्पन्न मिळवीत लासलगाव चौथ्या क्रमांकावर तर १७,८१,९५,३४४ उत्पन्न मिळवीत अमरावती पाचव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावांचे असून २७ वर्षापूर्वी २८ डिसेंबर १९९५ ला स्थापन झालेल्या व आमदार दिलीपराव बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून दिलेल्या विविध सोयी सुविधा, रोख व्यवहार, शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याने अल्पावधीतच या बाजार समितीने राज्यात व देशात नावलौकिक मिळविला आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या मालकीची १५७ एकर जमीन आहे. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये एकूण ६५,८२,५७४ क्विंटल कांदा आवक झाली असून १,७१,६०,४५० क्रेट्स टोमॅटो आवक झाली आहे.

याव्यतिरिक्त धान्य, भाजीपाला, बेदाणा, डाळिंब यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. एप्रिल २०२२ पासून ४९,७३,३४३ क्विंटल कांदा आवक झालेली असून १,५८,५२,०१० क्रेट्स टोमॅटो आवक झालेली आहे.

आमदार बनकर यांनी १८ मार्च २००० ला बाजार समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर सहकाऱ्यासह शेतकरी हिताचे निर्णय घेत आर्थिक नियोजन, स्वच्छ व्यवस्थापन, खर्चात काटकसर व नियमित पारदर्शकपणे कामकाज करीत बाजार समिती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

बाजार समितीने मिळालेल्या उत्पन्नातून खर्चात काटकसर करीत आजपर्यंत सर्व विविध विकासकामे, सामाजिक दायित्व जपत ४२ कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत तर बावजार समितीवर एक रुपयाचेही कर्ज नसल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT