Water
Water Esakal
नाशिक

वाढत्‍या उन्‍हाळ्यात पाणी वापरातही वाढ; मागणीनुसार नियोजन

अरूण मलाणी

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागला असून, पिण्यासह दैनंदिन वापरात पाण्याचा वापर वाढला आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा गंगापूर धरणात सुमारे दहा टक्‍के पाणी साठ्यात घट आहे. असे असले तरी शहराच्‍या वाढीव मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाने (Water supply Department) पाणी पुरवठ्याचे नियोजन आखलेले आहे. दैनंदिन पाच दशलक्ष लिटर अतिरिक्‍त पाणी शहराला पुरविले जाते आहे. त्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात तर लांबच, पण नाशिककरांना मुबलक पाणी उपलब्‍ध होते आहे. (planning on Demand by Water Supply Department due to Increased water consumption in summer Nashik news)

या वर्षी उन्‍हाळ्याची तीव्रता अधिक असल्‍याने अनेक वेळा पाऱ्याने चाळीस अंश सेल्सिअस पातळी गाठली. तसेच, वारंवार ढगाळ वातावरणामुळे उकाड्यातही वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत शहरवासीयांकडून पाण्याच्‍या वापरात लक्षणीय वाढ झालेली आहे. ही बाब लक्षात घेत पाणी पुरवठ्याचे नियोजन आखले जाते आहे. शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्‍प येथून १२० दशलक्ष लिटर पाण्याची उचल होते. मात्र सद्यःस्थितीत यात चार दशलक्ष लिटरची वाढ करण्यात आलेली आहे. मुकणे धरणातून १३२ ऐवजी आता १३३ दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते आहे.

दरवर्षी उन्‍हाळा सुरू झाल्‍यावर एकीकडे पाण्याची मागणी वाढते. मात्र, धरण साठा खालावल्‍याने व काहीवेळा मॉन्‍सून लांबल्‍याने पाणी कपातीला शहरवासीयांना सामोरे जावे लागते. परंतु, गेल्‍या दोन वर्षांपासून मुबलक पाऊस झालेला असल्‍याने समाधानकारक साठा राहिला आहे. यामुळे या वर्षी पाणी कपातीचे संकट सध्यातरी टळले असल्‍याची स्‍थिती आहे. याउलट वाढीव मागणीचा विचार करता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे शहर परिसरात वाढीव स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे नागरिकांकडूनदेखील समाधान व्‍यक्‍त केले जाते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT