Sanitation workers descend into the sewers to clean the sewers from the bottom after removing encroachments from the scrap market esakal
नाशिक

Nashik: मालेगावला सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ! आवश्‍यक साधन सामग्री न पुरवता गटारींची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका प्रशासनाकडून शहरातील गटारांवरील अतिक्रमण काढल्यानंतर येथील गटारींनी मोकळा श्वास घेतल्यानंतर मनपा प्रशासनाकडून कायम स्वच्छता कर्मचारी आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून या गटारींची स्वच्छता केली जात आहे.

मात्र ही स्वच्छता करताना त्यांना आवश्‍यक साधन सामग्री न पुरविता सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जात असून सर्रास कामगारांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. (Play with lives of cleaning staff in Malegaon Cleaning of drains without providing necessary equipment Nashik)

शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या हंगामात एकमेव झालेल्या जोरदार पावसाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पोलखोल झाली. उंच सखल भागात गटारीतील सांडपाणी रस्त्यावर आले.

त्यामुळे शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, कुसुंबा रोड, सुपर मार्केट, हजार खोली, जाफर नगर, किदवाई रोड, निहाल नगर, आझादनगर, पवारवाडी यासह शहरातील विविध भागातील नाले व गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

येथील गटारी तळापासून उपसल्या जात आहेत. यासाठी मनपाचे नियमित सफाई कर्मचारी आणि खासगी ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांकडून ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. परंतु स्वच्छता मोहीम राबविताना कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

गटारी स्वच्छ करण्यासाठी कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हातातील पंजे, मास्क, गणवेश, खास बूट यासह कुठलेही आवश्‍यक साहित्य पुरविले गेलेले नाही. रोज शेकडो कर्मचारी गटारीत उतरून साफसफाई करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे काम करताना कामगारांचे हात व पाय गटारीच्या पाण्यात बुडतात. यातूनच कामगारांना विविध आजार, दुखापत आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते. सातत्याने सांडपाण्यात उतरून काम केल्याने कामगारांना त्वचेचे, लेप्टो पायरोसीस यासह विविध आजार होण्याची भीती असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने कामगारांना साधनसामुग्री व गणवेश उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.

"सफाई कामगार गटारीच्या पाण्यात उतरल्याने त्यांना पिवळी कावीळ, डेंगू, अतिसार, खाज, मलेरिया, श्वसनाचे व अन्य आजार होवू शकतात."- डॉ. शरद शिरोळे

"महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ठेका देताना कर्मचाऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातील याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही. कामगारांना सर्व सुविधा द्याव्यात."- मोहम्मद रिझवान मोहम्मद अकबर अध्यक्ष, आवमी पार्टी मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT