crop insurance scheme latest marathi news sakal
नाशिक

PM पीक विमा योजना : शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) खरीप व रब्बी (Rabi season) हंगामासाठी ‘कप ॲण्ड कॅप (८० : ११०) मॉडेलनुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरून मान्यता देण्यात आली. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावा.

विम्याचा भार कमी करण्यासाठी खरिपासाठी (kharif) हप्ता दोन, तर नगदी पिकांसाठी पाच टक्के निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली. (PM Crop Insurance Scheme Farmers have till 31st July to apply nashik latest marathi news)

खरिपात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यासाठी मुंबईच्या एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांनी तसे संबंधित बँकेस अथवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असेल, असे सांगून श्री. सोनवणे म्हणाले, की पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड-रोग आदींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट आहे.

हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी देखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी अथवा बँकेशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषिअधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

पीकविमा योजनेची माहिती

पिकाचे नाव विमा संरक्षित रक्कम रुपये शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता रुपये

(प्रति हेक्टर)

भात ४९ हजार ५०० ९९०

खरीप ज्वारी ३० हजार ६००

खरीप बाजरी ३० हजार ६००

नाचणी १३ हजार ७५० २७५

मका ३५ हजार ५९८ ७११.९६

तूर ३६ हजार ८०२ ७३६.०४

मूग २० हजार ४००

उडीद २० हजार ४००

भुईमूग ४२ हजार ९७१ ८५९.४२

सोयाबीन ४९ हजार ५०० ९९०

कारळे १३ हजार ७५० २७५

कापूस ४९ हजार ५०० २ हजार ४७५

खरीप कांदा ८१ हजार ४२२ ४ हजार ७१ रुपये १० पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT