PM Modi esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदी करणार गोदाघाटाची पाहणी : गिरीश महाजन

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असून, या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असून, या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.

त्याचबरोबर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन, आरतीबरोबरच आता गोदाघाटाच्या पाहणीचेही नियोजन झाले असून, दिल्लीतून दौरा निश्‍चित झाल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (PM Modi Nashik Visit Prime Minister Modi will visit godaghat Girish Mahajan)

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त महाजन दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. दौऱ्याचे संपूर्ण नियोजन ते करत असून, प्रत्येक गोष्टीची बारीक-सारीक माहिती घेण्याबरोबरच दौऱ्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एसपीजीचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. प्रथम मोदींचा ‘रोड-शो’ आणि नंतर महोत्सव उद्‍घाटनाचे नियोजन होते.

त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराच्या दर्शनाला यावे, अशी मागणी पुजाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याला आता पंतप्रधान कार्यालयानेही दुजोरा दिला असल्याची माहिती महाजन यांनी शासकीय विश्रामगृहावर बुधवारी (ता. १०) या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना दिली.

ते म्हणाले, श्री काळाराम मंदिरात दर्शनासह गोदाघाटावर देखील ते जाणार आहेत. काळाराम मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या दौऱ्याला दिल्लीतून मान्यता मिळाली आहे.

नाशिकपासून जवळ असलेले त्र्यंबकेश्‍वर हे महत्त्वाचे धार्मिक शहर आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबक कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

राऊतांनी बालिश विधाने थांबवावी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तासंघर्षाचा निकाल माहीत असल्यानेच ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याची टीका राऊत यांनी केली. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांनी बालिश विधाने थांबवावी.

महायुतीकडे २१० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार स्थिर असल्याचा दावा केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असून, त्यातून मार्ग निघेल, असा दावा केला.

पानेवाडी येथील टँकरचालकांमधील काही चालक मुद्दाम आंदोलन करून गाड्या अडवत असल्याचा आरोप केला.

अधिकृत संघटनाचे समाधान झाले आहे. त्यामुळे टँकर बंद होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे महाजन म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल ४८ जागा मिळतील, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही. मोदी हेच एकमेव पर्याय आहे. राहुल गांधी देशाला महासत्ता बनवू शकत नाही.

शाळा सुरू राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ तारखेच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कारणास्तव शहराताली शाळा व कॉलेजेस बंद ठेवण्यासंदर्भात मागणी केली जात होती. परंतु महाजन यांनी शाळा, कॉलेजेस यांना कोणत्याही परिस्थितीत सुटी दिली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत थोडेफार बदल होतील, मात्र शाळा व कॉलेजेस बंद ठेवले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT