PM Modi Nashik Visit Sri Kalaram Mandir Darshan with Public Meeting Road Show rak94 
नाशिक

PM Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज! जाहीर सभा, ‘रोड शो’सह घेणार श्री काळाराम दर्शन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर सज्ज झाले असून, मोदी यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन व आरती, तसेच कुंभमेळा होणाऱ्या त्या गोदाघाटाची पाहणी व शक्य झाल्यास तेथेही आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

रोहित कणसे, सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर सज्ज झाले असून, मोदी यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन व आरती, तसेच कुंभमेळा होणाऱ्या त्या गोदाघाटाची पाहणी व शक्य झाल्यास तेथेही आरतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी महाराज चौक या दरम्यान १.१ किलोमीटर रोड-शो होईल त्यानंतर तपोवनातील मोदी मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासह कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला.

२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची तपोवनाच्या मोदी मैदानावर भरपावसात जाहीर सभा झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेशपान ८ वर यात्रेचा समारोप याच मैदानावर झाला. त्या वेळी मोदी यांची जाहीर सभा झाली होती. सर्वाधिक गर्दी व मोदी यांचीच सभा झाल्याने या मैदानाला मोदी, असे नाव आपोआप पडले आहे. पंतप्रधान मोदी यांची त्याच मैदानावर तिसरी सभा होत आहे. आतापर्यंत या मैदानावर भाजप वगळता एकाही राजकीय पक्षाची सभा झालेली नाही.

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी अकराला जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी गेल्या तीन दिवसांपासून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तळ ठोकून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी अकराला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन व त्यानंतर सभा होईल. सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित कापडी मंडप उभारण्यात आला आहे.

२०० फूट रुंद व ८०० फूट लांब मंडपामध्ये ५० हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपामध्ये ४० बाय १०० फूट आकाराचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय युवक व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

जाहीर सभेपूर्वी हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत दीड किलोमीटरचा रोड-शो होईल. त्यानंतर श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतील. येथे मोदी यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर गोदाघाट पाहणी करतील. मोदी यांच्या हस्ते गोदाआरती करण्याचे नियोजन आहे. मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर तपोवन परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्तचर विभागाच्या पथकांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Dispute in Kolhapur : महायुतीचा तांत्रिक डाव की सतेज पाटलांची नवी चाल? 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरून कोल्हापुरात राजकीय संघर्ष टोकाला, आज कोर्टात सुनावणी

Pune Crime : पुण्यातील सारसबागेसमोर खळबळजनक घटना; तीन दिवसांपासून एकाच जागी उभ्या कारमधून दुर्गंधी अन्...

Astrologer Mishra: इतरांचे राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचार्यांच्या पत्नीचाच निवडणुकीत सपाटून पराभव! ३०० मतेही मिळाली नाहीत

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

SCROLL FOR NEXT