In the retirement program, Principal Dr. V. B. Maltita gets excited while interacting with Gaikwad.
In the retirement program, Principal Dr. V. B. Maltita gets excited while interacting with Gaikwad. esakal
नाशिक

Positive News : शाळकरी चिमुकल्यांच्या कवयित्री मावशी! सातवी पास मालतीताईंनी लिहिल्या 200 कविता

आनंद बोरा

Positive News : गंगापूर रोडवरील आदर्श शिशु विहार अभिनव बालविकास मंदिरच्या सेविका व शाळकरी चिमुकल्यांच्या आवडत्या मावशी असलेल्या मालतीताई सुनील आव्हाड ह्या कवयित्री आहेत.

सातवी पास असलेल्या मालतीताईंनी विविध विषयांवर दोनशे कविता लिहिल्या आहेत. कविता लेखनाचा छंद जोपसल्याबद्दल ‘मविप्र'चे सरचिटणीस ॲड्. नितीन ठाकरे यांनी कौतुक केल्याचे मालतीताईंनी सांगितले. (Poet aunt of school children 200 poems written by seventh pass Maltitai awhad nashik news)

शाळेतील मुलांना बसगाडीमध्ये बसविणे, मुलांना घरापर्यंत पोचवण्याचे काम मालतीताई करतात. हे काम करताना वेळ मिळाला की हातात कागद आणि पेन घेऊन सामाजिक विषयांवर कविता लिहितात.

गेल्या दहा वर्षांपासून त्या संस्थेत सेविका म्हणून कार्यरत आहेत. पती रिक्षा चालवत असत; पण अपघात झाल्याने त्यांची रिक्षा गेली अन्‌ सर्व जबाबदारी मालतीताईंवर आली. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.

आपण शिकलो नाही; परंतु मुलांना शिकवायचे, या ध्येयाने त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केले. पुस्तके वाचण्याची आवड असल्याने त्यांची शब्दांवर पकड निर्माण झाली.

मालतीताईंच्या चार वह्या कवितांनी भरल्या आहेत. त्यांच्या कवितांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही कौतुक केले. डॉ. वसंतराव पवार यांच्यावरील त्यांची कविता स्मरणिकेत प्रकाशित झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांची गो मातेवरील कविताही सुंदर आहे. डॉ. पवार यांच्यावर कविता केल्याबद्दल त्यांचा अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांची प्रत्येक कविता काही ना काही शिकवते.

निसर्ग, पर्यावरण, खेळ, स्री भ्रृण हत्या, थोर व्यक्ती, जिवंत विषयांवर त्यांच्या कविता आहेत. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात त्या आई-वडिलांच्या सेवेविषयी उपस्थितांशी संवाद साधतात.

लहानपणी शेतात काम करताना चांगले संस्कार मिळाले. शेणावर उगवलेली राजगिऱ्याची भाजी विकली, असे सांगणाऱ्या मालतीताईंना स्वतःचा कवितासंग्रह प्रकाशित करायचा आहे.

"सेविकेच्या निवृत्तीचे वय पंचावन्न केल्याने मला पुन्हा शाळेत काम करण्याची संधी मिळाली. आता मी मुलांना परीपाठावेळी कविता ऐकवते. चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करते. प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीवेळी त्यांच्यावर केलेली कविता सर्वांना आवडली होती."

-मालती आव्हाड, कवयित्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT