crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : टाकळी रोडवर ट्रकचालकाला लुटण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपनगर येथील टाकळी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकला अडवून चालकाकडील रोकड व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

दिवे चौकात शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री सदरची घटना घडली. (Police arrested 2 people who stopped truck on Takli Road midnight tried to grab cash mobile from driver nashik crime news)

राज अशोक पवार (२०, रा. संत कबीर मार्ग, समतानगर, नाशिकरोड), सौरभ विजय आहिरे (२३, रा. प्राईड प्रतिक अपार्टमेंट, शिवाजीनगर, पुणा रोड) असे लुटमार करणाऱ्या दोघा संशयितांची नावे आहे.

बाळू सूर्यभान कोकाटे (रा. झापेवाडी, ता. शिरुर कासार, जि, बीड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास ते ट्रक (एमएच १६ सीडी ७१८०) घेऊन टाकळी रोडने जात असताना दिवे चौकात मोपेडवरून (एमएच १५ इव्ही २०७६) आलेल्या दोघा संशयितांनी ट्रकला आडवे झाले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ट्रक थांबल्यावर संशयितांनी ट्रकचालकाकडील रोकड १० हजार रुपये व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी गस्तीवरील पोलीस गाडी आल्याने संशयितांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करून अटक केली.

याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बटुळे हे पुढील तपास करीत आहेत. संशयितांकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT