Nashik Crime Sakal
नाशिक

नाशिक : पालकमंत्री भुजबळ यांच्या नावाने फसवणूक करणारा गजाआड

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : पालकमंत्री भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय तुमचा जो काय विषय झालेला आहे याबाबत साहेबांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. तुम्ही मला समक्ष येऊन भेटा यावर आपण तोडगा काढू असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांची बदनामी व कासुर्डे नामक व्यक्तीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित महेंद्र पाटील (४६, रा. गंगापूर रोड , नाशिक) याने उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी कासुर्डे (पूर्ण नाव ठाऊक नाही) यांना फोन करून मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलत आहे. तुमच्या केस मध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, माझे भुजबळ साहेबांशी बोलणे झालेले आहे. तसेच माझे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. परंतु तुम्ही समक्ष या नाही तर तुमचा माणूस मला भेटायला पाठवा. खाली हात पाठवु नका, काय असेल ते करून घेऊ असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने कासुर्डे यांना फोन वरती संभाषण करणाऱ्या संशयित महेंद्र पाटील यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे .

गुन्हा दाखल

या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असता संशयित पाटील याने फोन केला. कासुर्डे यांच्या पत्नीच्या नावे निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व पालकमंत्री भुजबळ यांच्या कार्यालयातील अधिकारी महेंद्र पवार यांच्या तक्रारी वरून संशयित महेंद्र पाटील याच्या विरोधात बदनामी व फसवणुकीचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी किशोर कोल्हे, अंमलदार पंकज शेळके करीत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT