Assistant Inspector Pramila Kawle interacting with citizens and women in the park.  esakal
नाशिक

Nashik Crime : उद्यानासह चौकाचौकात बसणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांकडून चोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी, टवाळखोरांचा उपद्रव तसेच महिला युवतींची छेडछाडीचे प्रकार लक्षात घेत अंबड पोलिस ठाण्याच्या महिला सहाय्यक निरीक्षक प्रमिला कावळे यांनी थेट उद्यानांमध्ये तसेच चौकाचौकात विनाकारण बसून दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच चोप दिला आहे.

विशेष म्हणजे चौकाचौकात तसेच उद्यान जॉगिंग ट्रॅकमध्ये फिरणाऱ्या नागरिकांशी जनजागृतीपर संवाद साधून टवाळखोरांबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. (police beating people troubling in garden nashik crime news )

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर वचक निर्माण व्हावा, या उद्देशाने त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, सावतानगर, शिवशक्ती चौक परिसरातील उद्याने चौक तसेच जॉगिंग ट्रॅकवर पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला आहे.

तीन ते चार दिवसापासून नुकत्याच नव्याने रुजू झालेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत उद्यानांमध्ये बसणारे टवाळखोर, रिकामटेकड्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एवढेच नव्हे तर पोलिस आणि नागरिक संवाद होण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उद्यानांमध्ये जात नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांना एकत्रित आणत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आता रिकामटेकड्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

"महिलांना महिलांच्या समस्यांबाबत सर्व माहिती असते. एक महिला पोलिस अधिकारी निर्भीड काम करत असून समस्त महिलांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या अगदी निःसंकोच सांगितल्या पाहिजे. यामुळे गावगुंडांवर कठोर शासन होण्यास मदत होईल." - किरण गामणे- दराडे, माजी नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Electricity Issue : हिंजवडीवर वीजसंकट; केबल दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

'मी देहदान केलं आहे!' 'ठरलं तर मग'च्या सायलीने सांगितली आतली गोष्ट, म्हणाली, 'जेवढं आपण दान करू शकतो ते....'

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Latur Education: अकरावीसाठी पहिल्या फेरीत ३२ हजार ७७० विद्यार्थ्यांचा प्रवेश; आता दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

"त्यानंतर मला ताप अन् वाचा गेली" ठरलं तर मग फेम अभिनेत्याने सांगितला तो भयंकर प्रसंग ; "थिएटरने.."

SCROLL FOR NEXT